शिप्पूर येथे सामाजिक सभागृहाचा पायाभरणी समारंभ विद्याधर गुरबे यांच्या हस्ते संपन्न - चंदगड लाईव्ह न्युज

26 August 2022

शिप्पूर येथे सामाजिक सभागृहाचा पायाभरणी समारंभ विद्याधर गुरबे यांच्या हस्ते संपन्न

शिप्पूर तर्फ नेसरी येथे सभागृह कामाचे भूमी पूजन करताना विद्याधर गुरबे, सोबत सरपंच आप्पा शिखरे.

नेसरी / सी. एल. वृत्तसेवा

           माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या 25/15 फंडामधून मौजे शिप्पूर तर्फ नेसरी (ता. गडहिंग्लज) येथे मंजूर झालेल्या सामाजिक सभागृहाचा  पाया पूजन शुभारंभ पंचायत समिती गडहिंग्लजचे माजी उपसभापती विद्याधर गुरबे यांच्या शुभहस्ते संपन्न  झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच आप्पा जिवबा  शिखरे होते.

          या कार्यक्रमाला  ग्रा.प.सदस्य अनिल पाटील, जनाबाई गाडे, सुनीता भालेकर, पोलीस पाटील भरमू गुरव, ग्रामसेवक संदीप आदमापूरे, जय भारत सेवा संस्था चेअरमण संजय पोवार, तंटामुक्त अध्यक्ष भिवा सलामावाडे, अर्जुन पाटील, शंकर पाटील, बाळू पाटील, पांडुरंग पाटील, बाळासाहेब नाईक, आप्पा कांबळे, रामदास गुरव, दत्तात्रय पाटील व सर्व ग्रामस्थ उपस्थित होते. समाजिक सभागृह बांधणे या कामासाठी १५ लाख इतका निधी मंजूर झालेला असून आतापर्यंत शिप्पूर तर्फ नेसरी या गावासाठी  गृहराज्य मंत्री आमदार सतेज पाटील  यांच्या फंडातून व प्रयत्नातून गावामध्ये जवळ जवळ १ कोटी इतका निधी प्राप्त झाला असल्याचे विद्याधर गुरबे यांनी यावेळी बोलताना सांगीतले.

No comments:

Post a Comment