चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
पत्नीने घटस्फोटासाठी कोर्टात दावा दाखल केल्याच्या नैराश्येतून राहते घराच्या माळ्यावरील तुळीला नायलॅनच्या पट्याने गळफास घेवून आत्महत्या केली. जानबा शंकर पाटील (वय-38, रा. हल्लारवाडी, ता. चंदगड, जि. कोल्हापूर) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. आज सायंकाळी पाच वाजता हि घटना घडली. वडील शंकर जानबा पाटील यांनी याबाबतची वर्दी चंदगड पोलिसात दिली आहे.
याबाबत पोलिसांतून मिळालेली माहीती अशी की, जानबा पाटील यांची पत्नी तनुजा ही गेल्या आठ वर्षापासून सोबत राहत नाही. पत्नीने जानबा विरोधात घटस्पोटासाठी कोर्टात दावा दाखल केल्या पासुन जानबा हे नैराश्याचे जिवन जगत होते. आज सायंकाळी जानबा यांनी त्याचे पत्नीने घटस्पोटासाठी कोर्टात दावा दाखल केल्याचे नैराश्येतून राहते घराचे माळ्यावरील तुळीला नायलॉनचे पटयाने गळफास घेवुन आत्महत्या केली. घटनेची नोंद चंदगड पोलिसात झाली असून पो.हे.कॉ. श्री. बांबळे तपास करत आहेत.
No comments:
Post a Comment