कोलीकच्या विद्यार्थ्यांनी केली ५०० वृक्षाची लागवड - चंदगड लाईव्ह न्युज

15 August 2022

कोलीकच्या विद्यार्थ्यांनी केली ५०० वृक्षाची लागवड


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

          कोलीक (ता. चंदगड) येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त विद्यालयाच्या पुढाकारने वनक्षेत्रपाल प्रशांत आवळे व वनपाल एन. एम. धामणकर यांच्या सहकार्यातून विविध जातींच्या ५०० वृक्षांची लागवड करण्यात आली. यावेळी शाळेचे मुख्याद्यापक गुलाब पाटील यांनी पर्यावरणाचे महत्व पटवून दिले. 

         वनपाल श्री. धामणकर यांनी वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धन कसे करावे, याबाबत मार्गदर्शन व पावसाची तमा न बाळगता वृक्ष लागवड केली. याबाबत मुख्याद्यापक शिक्षक व विद्यार्थ्याचे कौतूक केले. यावेळी कार्यक्रमात पर्यावरण प्रमूख हिशेबकर पी. टी. शिक्षक, आर. के. पाटील, अशोक वर्पे, ए. एस. सावंत, गावडू पाटील, उत्तम पाटील, बाळू नाईक, जे. डी. धामणेकर, वनरक्षक तांबेकर, एम. आय. सनदी, एस. एस. बोंद्रे, पी. एम. शिंदे, एस. ए. गावडे, एन. व्हि. गावडे, मुदगेकर ग्रामसेवक गायकवाड, सरपंच संभाजी गावडे, उपसरपंच अनिल गावडे, ज्ञानेश्वर गावडे,पुंडलिक नाईक इतर सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. 

No comments:

Post a Comment