देशाला स्वातंत्र मिळवून देण्यात स्वातंत्र सैनिकांचे मोठे योगदान - माजी मंत्री भरमूआण्णा पाटील, चंदगड येथे स्वातंत्र सैनिक स्मारकाला भाजपाच्या वतीने अभिवादन - चंदगड लाईव्ह न्युज

14 August 2022

देशाला स्वातंत्र मिळवून देण्यात स्वातंत्र सैनिकांचे मोठे योगदान - माजी मंत्री भरमूआण्णा पाटील, चंदगड येथे स्वातंत्र सैनिक स्मारकाला भाजपाच्या वतीने अभिवादन

स्वातंत्र सैनिक स्मारकाला अभिवादन करताना.


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

         चंदगड येथील पंचायत समितीती आवारात असलेल्या स्वातंत्र सैनिकांच्या स्मारकाला भाजपाच्या वतीने अभिवादन करण्यात आले. माजी मंत्री भरमूआण्णा पाटील यांच्या हस्ते स्मारकाला पुष्पहार अर्पण करण्यात आला.

           यावेळी भरमुआण्णा म्हणाले, ``माझा जन्म स्वातंत्र पूर्व काळात झाला. त्यामुळे मला थोडे फार स्वातंत्र मिळवत असताना स्वातंत्र सैनिकांना काय यातना सहन करावं लागल्या याची जाणीव आहे. मला शिकविणारे देशपांडे गुरुजींनी त्या काळात स्वातंत्र सग्रांमात भाग घेतला होता, त्यासाठी त्यांना दोन वर्षाची शिक्षा झाली होती, हे मी जवळून पाहिले आहे. त्यामुळे या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यामध्ये स्वातंत्र्यसैनिकांचे फार मोठे योगदान आहे, ते आपण कधीच विसता कामा नये. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ९ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या काळात वेगवेगळे उपक्रमाचे नियोजन करून भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील गोष्टीना उजाळा देणयाचे काम केले आहे. भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण होत असताना हा अमृत महोत्सव सोहळ्यात सर्व देशातील नागरिकांनी आपापल्या घरावर तिरंगा ध्वज फडकविला जावा. प्रत्येक नागरिकाच्या मनात देश प्रेम निर्माण व्हावे. हा या पाठीमागील उद्दात हेतू असल्याचे मत व्यक्त केले.``

          यावेळी जि. प. सदस्य सचिन बल्लाळ, मार्केट कमिटीचे माजी सभापती तुकाराम बेनके, उदयकुमार देशपांडे, भाजप महिला तालुका अध्यक्ष समृध्दी काणेकर, भाजपा तालुका उपाध्यक्ष रत्नप्रभा देसाई, संदिप नाईक, दिपक कांबळे, रमजान खरवेसकर, अशोक पेडणेकर, पाडुरंग गावडे आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment