महिपाळगड येथे अमृत महोत्सवी स्वातंत्रदिनानिमित्त विधवा महिलांच्या हस्ते ध्वजारोहण - चंदगड लाईव्ह न्युज

14 August 2022

महिपाळगड येथे अमृत महोत्सवी स्वातंत्रदिनानिमित्त विधवा महिलांच्या हस्ते ध्वजारोहण

महिपाळगड येथे अमृत महोत्सवी स्वातंत्रदिनानिमित्त ग्रामपंचायत येथे ध्वजारोहण करताना श्रीमती सरिता सूबराव भोसले व इतर मान्यवर 

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

          महिपाळगड (ता. चंदगड) येथे अमृत महोत्सवी स्वातंत्रदिनानिमित्त विधवा महिलांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

        ग्रामसेवक  सूभाष वारे‌ यांनी विधवा प्रथा बंदीची माहिती दिली.  सरपंच प्रा. रमेश भोसले यांनी  महिलांनी विधवा प्रथा बंदीला दिलेल्या सहकार्याबद्दल धन्यवाद दिले. उपस्थित सर्व विधवा महिलांना सन्मानाने ओटी भरून स्वागत केले. यावेळी ग्रामपंचायतीमध्ये  श्रीमती सरिता सूबराव भोसले, श्रीमती अंजना विठ्ठल सावंत व अंगणवाडी मध्ये श्रीमती आनंदी मल्लाप्पा तुपारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. 

         कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी  पोलिस पाटील सौ. कोमल सावंत, ग्रामपंचायत सदस्य सौ, रेणूका केसरकर, सौ. शितल कदम, सौ. रेणूका सुतार यांनी परिश्रम घेतले. उपसरपंच मोनेश्री भोसले, संगणक चालक  वैजनाथ कदम, मनोहर सावंत, तुकाराम तुपारे, भरत भोसले आदीनी सहकार्य केले. यावेळी ग्रामस्थ  उपस्थित होते.

No comments:

Post a Comment