निट्टूर येथील गीता चव्हाण -पाटील यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

21 August 2022

निट्टूर येथील गीता चव्हाण -पाटील यांचे निधन

गीता चव्हाण -पाटील


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

        मुळच्या निट्टूर (ता. चंदगड) येथील रहिवासी व भांदुर गल्ली बेळगाव येथील वास्तव्यास असणाऱ्यां श्रीमती गीता विश्वासराव चव्हाण -पाटील (वय वर्ष ५९) यांचे शनिवार दि. २० रोजी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांचे पती विश्वासराव यांचे गेल्या १३ मे रोजी निधन झाले असून चव्हाण- पाटील परिवारावर हा मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. रक्षाविसर्जन सोमवार दि. २२ रोजी सकाळी आठ वाजता होणार आहे. त्यांच्या पश्चात एक कन्या, दोन बहिणी, दिर, भावजय, पुतणे, नातवंडे असा परिवार आहे. माजी आमदार कै. व्ही. के. चव्हाण-पाटील यांच्या त्या स्नुषा व यशवंतनगर येथील श्री कॅश्यु फॅक्टरीचे संचालक विक्रम चव्हाण-पाटील यांच्या त्या काकी होत.No comments:

Post a Comment