|
निवडणुकीमध्ये मतदान केल्यानंतर बोटाची शाई उंचाऊन दाखविताना विद्यार्थ्यींनी. |
चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
पॅनेल तयार करणे, अर्ज भरणे, डिपॉझीट भरणे, माघार घेणे, प्रचार करणे मतपत्रिका, उमेदवारांचे चिन्ह, बोटाला शाई लावणे, ओळखपत्र तपासणी, मतदान कक्ष, निवडणूक अधिकारी, गुप्त मतदान, निकालाची उत्कंठा व निकालानंतरचा जल्लोश ही कुठल्या राजकिय पक्षांची निवडणूक नव्हती तर चंदगड येथील न. भु. पाटील ज्युनि. कॉलेजमध्ये मुलांना लोकशाही वरचा विश्वास दृढ व्हावा म्हणून प्रत्यक्ष निवडणूक प्रकिया राबवली गेली.
|
पू निवडणुकीमध्ये मतदान केल्यानंतर बोटाची शाई उंचाऊन दाखविताना विद्यार्थी. |
प्राचार्य आर. पी. पाटील यांनी विद्यार्थ्यांना लोकशाहीचे महत्व पटवून सांगितले. या निवडणूकीमध्ये मुख्यमंत्री अक्षय रामान्ना पिराजी (बारावी विज्ञान 'अ') तर विद्यार्थीनी प्रतिनिधी म्हणून पौर्णिमा भगवंत तुपारे (बारावी विज्ञान 'अ') यांची बहुमताने विजय मिळविला. |
निवडणुक कक्षाचे उद्घाटन करताना शिक्षक प्राचार्य आर. पी. पाटील
|
या निवडणूकित एकूण बाराशे विद्यार्थ्यांनी मतदानाचा अधिकार बजावला. सर्व विजयी उमेदवारांचे गुलालाची उधळण करून जल्लोषी स्वागत करण्यात आले. |
मतदान करताना विद्यार्थ्यी मतदार.
|
या निवडणूक प्रक्रियेसाठी निवडणूक आयुक्त म्हणून प्रा. एस. ए. धायगुडे यांनी नियोजन केले. सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा . सौ. एम . एम. आमणगी, प्रा. बी. डी. मोरे, प्रा. एस. ए. शेख, प्रा. व्ही. बी. गावडे |
निवडणुक निकाल जाहीर करताना शिक्षक. |
प्रा. एस. एम. निळकंठ यांनी निवडणूक अधिकारी काम पाहिले. ही निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्म चाऱ्यांनी परिश्रम घेतले.
No comments:
Post a Comment