हेमरस शुगर्सतर्फे 23 हजार ऊस उत्पादकांना मार्गदर्शक पुस्तिकांचे होणार वाटप, युनिट हेड भरत कुंडल, कृषी अधिकारी सुधीर पाटील यांचा उपक्रम - चंदगड लाईव्ह न्युज

20 September 2022

हेमरस शुगर्सतर्फे 23 हजार ऊस उत्पादकांना मार्गदर्शक पुस्तिकांचे होणार वाटप, युनिट हेड भरत कुंडल, कृषी अधिकारी सुधीर पाटील यांचा उपक्रम


कागणी :पुस्तिका वाटप प्रसंगी ऊस विकास अधिकारी राजू सुतार, फिल्ड ऑफिसर विलास पाटील, सातेरी पाटील, वैभव पाटील, संजय देसाई आदी.

कागणी : सी. एल. वृत्तसेवा / एस. एल. तारीहाळकर

राजगोळी (ता. चंदगड) येथील हेमरस शुगर्स तथा ओलम ग्लोबल ऍग्री कमोडिटीज इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या शुगर फॅक्टरीतर्फे कार्यक्षेत्रातील ऊस पुरवठा करणाऱ्या चंदगड, आजरा, गडहिंग्लज, बेळगाव खानापूर, हुक्केरी तालुक्यातील 23 हजार ऊस उत्पादकांना ऊस उत्पादनासंदर्भात मार्गदर्शक पुस्तिका वाटप उपक्रम सुरू केला आहे.

या उपक्रमाची सुरुवात युनिट हेड भरत कुंडल व मुख्य कृषी अधिकारी सुधीर पाटील यांच्या हस्ते झाली.

 या उपक्रमाची माहिती देताना केन ऑफिसर राजू सुतार म्हणाले, चंदगड आजरा, गडहिंग्लज, बेळगाव, खानापूर, हुक्केरी या कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादन क्षेत्राचा पाच वर्ष अभ्यास केला. यासाठी पुणे येथून ऊस शास्त्रज्ञ आणून त्यांच्याद्वारे ऊस क्षेत्राचा अभ्यास केला. यातून ज्या त्रुटी आढळल्या त्या त्रुटीवर कशी मात करावी, कमी क्षेत्रात जादा ऊस उत्पादन कसे मिळवावे, याची माहिती संकलित करून एक पुस्तिका तयार केली आहे. 

    मुख्य कृषी अधिकारी सुधीर पाटील व ऊस शास्त्रज्ञ सुरेश माने - पाटील यांनी सदर पुस्तिका अभ्यासाअंती पूर्णत्वास नेली आहे. या पुस्तिकेचे वाटप विविध ठिकठिकाणी सुरू आहे. या पुस्तिकेमध्ये आपल्या परिसरातील ऊस क्षेत्रासाठी पूरक उसाची बेणे कोणते? आवश्यक ऊस उत्पादनासाठी खतांची मात्रा किती ? कोणत्या रोगराई साठी कोणते औषध, त्यासाठी आवश्यक फवारणी कशी करावी? ठिबक सिंचन असेल तर त्यासाठी काय उपाय योजना? आदी विविध मुद्द्यावर कमी शब्दात व मोलाची माहिती 40 पानामधून दिली आहे. 

या उपक्रमातून कागणी (ता. चंदगड) येथे मंगळवारी ऊस उत्पादकांना पुस्तिकेचे वाटप झाले.

ऊस विकास अधिकारी राजू सुतार, फिल्ड ऑफिसर विलास पाटील, वैभव पाटील, सातेरी पाटील, संजय देसाई (कागणी) यांनी पुस्तके वाटप केली. यावेळी पोलीस पाटील अमृत देसाई, पत्रकार संदीप तारिहाळकर, माजी उपसरपंच जनार्दन देसाई, कागणी सोसायटीचे सेक्रेटरी सागर राजगोळकर, सुरेश हगिदळे, माजी सरपंच अजित देसाई, गोविंदा कांबळे, निंगाप्पा कुदनुरकर, सुरेश देसाई, नरसिंग बाचुळकर, अरुण बाचुळकर, सरपंच बाळू देसाई, अशोक शहापूरकर अशोक भोगण, शशिकांत देसाई, सुरज देसाई, बापू देसाई, मनोहर देसाई पांडुरंग कांबळे, हनमंत भोगन उपस्थित होते.


 

No comments:

Post a Comment