औरनाळ येथे ४०० कचरा कुंडींचे वितरण - चंदगड लाईव्ह न्युज

21 September 2022

औरनाळ येथे ४०० कचरा कुंडींचे वितरण

औरनाळ येथे कचरा कुंडीचे वितरण करताना गडहिंग्लज पंचायत समितीचे माजी उपसभापती विद्याधर गुरबे, माजी उपसभापती इंदुताई नाईक व इतर

गडहिंग्लज /  सी. एल. वृत्तसेवा

        औरनाळ (ता. गडहिंग्लज) येथील ग्रामपंचायतीला गडहिंग्लज पंचायत समितीच्या १५ वित्त आयोगाकडून मंजूर ४०० कचरा कुंडीचे वितरण उपसभापती विद्याधर गुरबे यांच्या हस्ते करण्यात आले. गडहिंग्लज पंचायत समितीचे माजी उपसभापती विद्याधर गुरबे व माजी उपसभापती इंदुताई नाईक यांच्या फंडातून या कचरा कूंडी मजूंर झाल्या.

        यावेळी संजय गांधी निराधार योजनेचे सदस्य प्रशांत देसाई, राहुल शिरकोळे, माजी जिल्हा परिषद सदस्य मलगौंडा पाटील, सरपंच संदीप पाटील, उपसरपंच शिवाजी सावंत, ग्रामसेविका सुजाता बरगाले, सचिन मोरे, मयूर चौगुले यासह मराठी  शाळेचे शिक्षक, अंगणवाडी सेविका, शिक्षकेतर कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते. 

No comments:

Post a Comment