मोर्ले ते पारगड किल्ला रस्ता कामाची बांधकाम विभाग यांनी मुदतवाढ घेऊन तातडीने काम सुरू केले नाही तर १ आॅक्टोंबर रोजी उपोषणाचा इशारा - चंदगड लाईव्ह न्युज

21 September 2022

मोर्ले ते पारगड किल्ला रस्ता कामाची बांधकाम विभाग यांनी मुदतवाढ घेऊन तातडीने काम सुरू केले नाही तर १ आॅक्टोंबर रोजी उपोषणाचा इशारा

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

           गेल्या काही वर्षांपासून बांधकाम विभाग यांच्या निष्काळजीपणामुळे रखडलेल्या मोर्ले ते पारगड किल्ला रस्ता कामाला बांधकाम कार्यकारी अभियंता यांनी वनविभाग कडून मुदतवाढ घेऊन तातडीने कामाला सुरुवात केली नाही तर पारगड किल्ला पं‌चक्रोशीतील ग्रामस्थ सावंतवाडी बांधकाम विभाग कार्यालय येथे १ आॅक्टोंबर पासून बेमुदत उपोषणाला बसणार असल्याचे माजी सरपंच विद्याधर बाणे व इतर ग्रामस्थ यांनी सांगितले.

   सिंधुदुर्ग कोल्हापूर जिल्हृयांना तसेच शिवकालीन पारगड किल्ला याला जोडणारा रस्त्याचे काम हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात दोडामार्ग हद्दीत दोन वर्षे रखडले. याला बांधकाम अधिकारी जबाबदार आहेत. चंदगड हद्दीत संबंधित ठेकेदार याने बरेच काम पूर्ण केले डांबरीकरण बाकी आहे. पण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कामामुळे दोन वर्ष वाया गेली संबंधित अधिकारी यांनी ठेकेदाराकडून दिलेल्या मुदतीत काम करुन घेतले नाही. त्यामुळे वन विभाग यांनी दिलेल्या मुदतीत काम पूर्ण झाले नाही, त्यामुळे वनविभाग अधिकारी यांनी पुढील काम थांबवले आहे.

        मोर्ले ते पारगड किल्ला रस्ता यात वनविभाग यांची काही किलोमीटर जमीन जाते, यात परवानगी दिली होती. हजारों झाडे तोडून ही जागा दिली होती. तेव्हा वन विभाग यांनी अडीच वर्षे मुदत दिली होती. पण बांधकाम विभाग सिंधुदुर्ग यांच्यामुळे काम रखडले आहे, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

     वन विभाग यांनी काही महिन्यांपूर्वी वनविभागाकडून सहा महिन्यांच्या आत मुदतवाढ घेतो असे सांगितले होते. पण अद्याप कोणतीही हालचाल झालेली नाही. त्यामुळे आता काम सुरू होणे शक्यता कमी आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी आंदोलन करुन उपोषण करण्याचा निर्धार केला आहे.

          बांधकाम अधिकारी यांनी तातडीने वन विभागाकडे  प्रस्ताव सादर करुन मुदतवाढ घेऊन तातडीने रस्ता कामाला सुरुवात करावी. यासाठी १ आॅक्टोंबर रोजी सावंतवाडी बांधकाम कार्यालय येथे तंटामुक्त अध्यक्ष रघुवीर शेलार, विद्याधर बाणे, मनोहर पवार, बुधाजी पवार, आत्माराम बाणे, देवीदास पवार आदी प्रमुखासह  पारगड, नामखोल, इसापूर, मिरवेल, मोर्ले, गावातील ग्रामस्थ उपोषणाला बसणार आहेत.

No comments:

Post a Comment