चंदगड पोलिसांनी केले अपघातग्रस्ताचे ४८ हजार रूपये परत, कोठे व कधी झाला अपघात........ - चंदगड लाईव्ह न्युज

21 September 2022

चंदगड पोलिसांनी केले अपघातग्रस्ताचे ४८ हजार रूपये परत, कोठे व कधी झाला अपघात........

पोलीस अंमलदार भूषण महापूरे यांचा प्रामाणिकपणाबद्दल सत्कार करताना पो. नि. संतोष घोळवे व इतर.

 चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

           चंदगड येथील मदरसा जवळ झालेल्या अपघातात जखमी कृष्णा रामा कुंदेकर (रा. शिरगांव, ता. चंदगड (वय ६१ वर्ष) या जखमी गृहस्थाची रस्त्याच्या कडेल्या पडलेल्या प्लॅस्टिक पिशवीतील ४८ हजार ७०० रूपये रोख रक्कम पोलीस नाईक भूषण महापूरे यांनी परत केली. याबद्दल पो. नि. संतोष घोळवे यांनी श्री. महापूरे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

     यासंदर्भात अधिक माहीती अशी की,  चंदगड-ते शिरगांव फाट्या दरम्यान असलेल्या मदरसा समोर दोन दुचाकी स्वाराची समोरासमोर धडक होऊन १५ सप्टेंबर रोजी सायंकळी चार वाजता अपघात झाला होता. या अपघाताची माहीती मिळताच पोलीस अंमलदार भूषण महापूरे तातडीने घटनास्थळी पोहचले. मात्र त्या अगोदरच लोकांनी जखमींना दवाखान्यात उपचारासाठी घेऊन गेले. यावेळी पोलीस नाईक महापूरे यांनी घटनास्थळीच पहाणी करत असताना दुचाकीजवळ एक प्लॅस्टिकची पिशवी दिसली. पिशवी तपासली असता त्यामध्ये कृष्णा रामा कुंदेकर यांच्या नावाचे बॅक पासबूक व ४८ हजार ७०० रूपये रोख रक्कम मिळून आली. श्री. महापूरे यांनी खातरजमा करून बँक पासबूक रोख रक्कम जखमी कुंदेकर यांचे नातेवाईक विलास कुंदेकर यांचेकडे दिली. पोलीस नाईक महापूरे यांनी केलेल्या प्रामाणिक कामाबद्दल पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांनी पोलीस ठाण्यात महापूरे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी पोलिस उपनिरीक्षक कांबळे, हवालदार कसेकर, पो. हे. काॅ. डोंगरे, किल्लेदार उपस्थित होते.

No comments:

Post a Comment