चंदगड तालुक्यातून माय मराठी महाराष्ट्र राज्य अध्यापक संघावर संजय साबळे व एम. एन. शिवणगेकर यांची निवड - चंदगड लाईव्ह न्युज

20 September 2022

चंदगड तालुक्यातून माय मराठी महाराष्ट्र राज्य अध्यापक संघावर संजय साबळे व एम. एन. शिवणगेकर यांची निवड

संजय साबळे

एम. एन. शिवणगेकर

चंदगड : / सी. एल. वृत्तसेवा

        कोल्हापूर येथील राजर्षि शाहू महाराज सभागृहात झालेल्या कार्यक्रमात मराठी राज्य अध्यापक संघाचे अध्यक्ष कविवर्य लक्ष्मण महाडिक (नाशिक) यांच्या हस्ते माय मराठी महाराष्ट्र अध्यापक संघाच्या कार्यकारणीत चंदगड तालुक्यातून संजय साबळे व एम. एन. शिवणगेकर यांना निवडपत्र व ग्रंथ भेट देण्यात आले. 

         चंदगड तालुक्यात मराठी भाषा चळवळसाठी दिलेल्या योगदान लक्षात घेऊन ही निवड करण्यात आली. यावेळी राज्य अध्यापक संघाचे विश्वस्त हनुमंत कुबडे (पुणे),  अशोक तकटे (नागपूर), सारंग पाटील (सांगली),  राजेंद्र पाटील उपस्थित होते. त्यांच्या या निवडीमुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

No comments:

Post a Comment