कोल्हापूर येथे तुलशी बाझारची शाखा सुरू करणार : आम. पाटील, चंदगड तालुका संघाची सभा, 60 लाखांचा नफा, सभासदांना तीन किलो तेल, कामगारांना १० % पगारवाढ, तीन पगार बोनस - चंदगड लाईव्ह न्युज

24 September 2022

कोल्हापूर येथे तुलशी बाझारची शाखा सुरू करणार : आम. पाटील, चंदगड तालुका संघाची सभा, 60 लाखांचा नफा, सभासदांना तीन किलो तेल, कामगारांना १० % पगारवाढ, तीन पगार बोनस

तालुका संघाच्या वार्षिक सभेत बोलताना आमदार राजेश पाटील

चंदगड : प्रतिनिधी / सी. एल. वृत्तसेवा 

चंदगड तालुका खरेदी विक्री संघाच्या जडणघडणीत सभासद, कामगारांचे श्रम मोलाचे असून यामुळेच संघाची घौडदौड सुरू आहे. जनमानसातील विश्वासार्हतेमुळेच संघाला सहकार भूषण पुरस्कार मिळाला आहे. चंदगड तालुक्यासह  गडहिंग्लज उपविभागातील सहकार टिकावा यासाठी प्रयत्न करणार असून कोल्हापूर येथे तुलशी बझारची शाखा  सुरू करणार असल्याची माहिती आम. राजेश पाटील यांनी दिली.

तालुका संघाच्या वार्षिक सभेला उपस्थित सभासद.

     ते शिनोळी येथे चंदगड तालुका खरेदी विक्री संघाच्या ६३ व्या सर्वसाधारण सभेत बोलत होते.

प्रारंभी सहकार भूषण माजी आम. कै. नरसिंगराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

      आम. पाटील पुढे म्हणाले माझ्यावर जेव्हा या संघाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी आली तेंव्हा संघाला 5 लाख रुपये नफा झाला होता. तो आज  ६० लाख 70 हजार रु. इतका  नफा झाला आहे. संघाच्या ३७ शाखा सभासद, शेतकऱ्यांना सेवा पुरवत आहेत. त्यामुळे यावर्षी सभासदांना ३ किलो तेल व कामगारांना१०% पगार वाढ व 3 पगार बोनस दिला जाणार असल्याचे जाहीर केले. कै. नरसिंगराव पाटील यांनी या जिल्ह्यात सहकार बळकट करण्यासाठी अथक परिश्रम घेतले होते. त्यांची कारकीर्द  पुढे नेण्यासाठी व सहकार वाचवण्याचा प्रयत्न करू,  असे सांगितले. 

        यावेळी अहवाल वाचन संघाचे सचिव एस. वाय. पाटील यांनी केले. सभासदांनी विविध विषयांवर चर्चा केली व संघाला कै. नरसिंगराव पाटील यांचे नाव देण्याची मागणी केली. तर नरसिंगराव पाटील यांचे स्मारक उभे करण्याची मागणी केली. यावेळी आम. पाटील यांनी लवकरच स्मारकाचा शुभारंभ करू, असे सांगितले.

       यावेळी संचालक तानाजी गडकरी, विठोबा गावडे, जानबा चौगले, अभय देसाई, बाळासाहेब घोडके, राजीव जाधव, अली मुल्ला, पुंडलिक पाटील, रामचंद्र बेनके, परसु पाटील, गोपाळराव गावडे, विठ्ठल पावले, महादेव चौकुळकर, दयानंद पाटील, राजाराम पाटील, नारायण पाटील, विजयमाला कोकीतकर, विद्या चिटणीस, बंडोपंत चिगरे, गणेश फाटक, एस. एल. पाटील, भिकू गावडे, सुर्यकांत पाटील, एम जी पाटील, शिवानंद हुंबरवाडी आदीसह सभासद, शेतकरी, कर्मचारी उपस्थित होते. आभार उपाध्यक्ष पोमाना पाटील यानी मानले.




No comments:

Post a Comment