नागनवाडी येथील संजय गांधी विद्यालयात शालेय अनुभव कार्यक्रम उत्साहात - चंदगड लाईव्ह न्युज

25 September 2022

नागनवाडी येथील संजय गांधी विद्यालयात शालेय अनुभव कार्यक्रम उत्साहात

नागनवाडी येथील संजय गांधी विद्यालयात शालेय अनुभव कार्यक्रम उत्साहात

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

          नागनवाडी (ता. चंदगड) येथील संजय गांधी विद्यालयात तुर्केवाडी येथील महादेवराव बी. एड. काॅलेज अंतर्गत  शालेय अनुभव कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्याध्यापक एम. आर. भोगुलकर यांच्या हस्ते झाले. 

      प्रारंभी स्वागत के. डी. बारवेलकर यांनी केले. शाळा आणि समाजाचे जवळचे नाते असून ते एकमेकांवर औपचारिक शिक्षण संस्था असून काही विशिष्ट उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून मानवाने शाळेची निर्मिती समाजाच्या सर्वांगिण विकासाठी केली आहे. शाळेत मूल्ये रूजविण्यासठी विविध उपक्रमांचे बीएड विद्यार्थ्यांमार्फत आयोजन केले जाते. असेच उपक्रम नागनवाडी येथील संजय गांधी विद्यालयात  महादेवराव वांद्रे कॉलेज तुर्केवाडी अंतर्गत शालेय अनुभव कार्यक्रमातील सावित्रीबाई फुले गटातील छात्राध्यापकांनी आयोजित केले . यामध्ये हिंदी दिन . जागतिक ओझोन दिन,  चित्र प्रदर्शन, रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.यामध्ये  विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग दर्शविला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी विस्तार अधिकारी एम. टी. कांबळे यांचा सेवानिवृत्तीबद्दल प्राचार्य एन. जे. कांबळे यांच्या हस्ते शाल श्रीफळ, भेट वस्तू देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी प्रा. ग. गो. प्रधान, श्री. गुरव उपस्थित होते. सुत्रसंचालन सविता चौगुले हिने केले तर आभार अश्लेषा भंडारी हिने मानले.

No comments:

Post a Comment