हलकर्णी महाविद्यालयात यश स्पोर्ट्स अकॅडमीची स्थापना - चंदगड लाईव्ह न्युज

25 September 2022

हलकर्णी महाविद्यालयात यश स्पोर्ट्स अकॅडमीची स्थापना

हलकर्णी महाविद्यालयात यश स्पोर्ट्स अकॅडमीची स्थापना प्रसंगी शिक्षक व विद्यार्थ्यी.

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

           चंदगड तालुक्यातून दर्जेदार खेळाडू  विद्यार्थी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण व्हावे या उद्देशाने यशवंतराव चव्हाण महाविद्यालय व गुरुवर्य गुरुनाथ विठ्ठल पाटील कनिष्ठ महाविद्यालयामध्ये यश स्पोर्ट्स अकॅडमीची स्थापना करण्यात आली. या अकॅडमीचे उद्घाटन दौलत विश्वस्त संस्थेचे अध्यक्ष अशोकराव जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.

       यावेळी उपाध्यक्ष संजय पाटील, संचालक वसंत निकम, पुंडलिक पाटील, बाबुराव गावडे, मल्लिकार्जुन मुगेरी, राजू पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. डी अजळकर, क्रिडविभाग प्रमुख प्रा. डॉ. अर्जुन पिटुक, डॉ. अनिल गवळी, प्रा. पी. ए. पाटील, प्रा. एन. एम. कुचेकर उपस्थित होते. यावेळी बोलताना अशोकराव जाधव म्हणाले, ``आमच्या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या मध्ये गुणवत्ता ठासून भरलेली आहे वेगवेगळ्या क्षेत्रात आमचे विद्यार्थी यश मिळवून मोठ्या पदावरती काम करत आहेत त्याचप्रमाणे  आमच्या ग्रामीण भागातील खेळाडू विद्यार्थ्यांना आपली गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी वाव मिळावा व आमच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावर एक गुणवंत खेळाडू म्हणून नाव कमवावे  व आपल्या महाविद्यालयाचे व तालुक्याचे नाव लौकिक वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत. हा उद्देश ठेवून आम्ही अकॅडमी ची स्थापना केली आहे. याचा लाभ चंदगड तालुक्यातील सर्व विद्यार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन केले. प्राचार्य डाॅ. अजळकर याxनीही तरुणांना करियर विषयी मार्गदर्शन केले.

No comments:

Post a Comment