नांदवडे ग्रामपंचायतीच्या वतीने मंगळवारी महिला मेळावा व हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन - चंदगड लाईव्ह न्युज

25 September 2022

नांदवडे ग्रामपंचायतीच्या वतीने मंगळवारी महिला मेळावा व हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन

 चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

           नांदवडे (ता. चंदगड) येथे ग्रुप ग्रामपंचायत नांदवडे-शेवाळे यांच्या वतीने हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन नवरात्र निमित्त मंगळवार दिनांक २७ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी १० वाजता महिला मेळावा व हळदी-कुंकू कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. 

         कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून सौ. निता प्रसाद वावरे (Demo Officer Globe India Ventures Private Ltd.) असतील. राज्यस्तरीय व्याख्याता यशदा पुणे राज्य अध्यक्ष महिला आघाडी सरपंच परिषद मुंबईच्या सौ.राणी बाळासाहेब पाटील या प्रमुख वक्त्या आहेत. कार्यक्रमाला राजेंद्र वैजू कांबळे (सरपंच), नारायण संभाजी पाटील (उपसरपंच), सौ. संगीता शिवाजी गावडे, सौ. संजीवनी संपत पेडणेकर, सौ. अस्मिता सुधाकर पाटील, सौ. संजीवनी सुरेश सुतार, सौ. अश्विनी अशोक गावडे, परशराम म्हातारू फडके, विद्यानंद पुंडलिक सुतार सदस्य, सौ. अश्विनी विनायक कुंभार (ग्रामसेविका) ग्रामपंचायत नांदवडे-शेवाळे. सौ. कविता विजय शिंदे (ग्रामसंघ अध्यक्ष) यांच्यासह महिला व ग्रामस्थांनी उपस्थित रहावे असे आवाहन नांदवडे-शेवाळे ग्रामपंचायतीच्या वतीने केले आहे. 

No comments:

Post a Comment