पुरस्कार स्विकारताना अनिल देसाई |
तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा
अडकूर (ता. चंदगड) येथील अनिल आप्पा देसाई यांना सन २०२२ सालचा बेस्ट केमिस्ट पुरस्कार कोल्हापूर येथे नुकताच प्रदान करण्यात आला.
कोल्हापूर जिल्हा केमिस्ट असोसिएशनच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत एमएससीडीएचे सचिव अनिलभाऊ नावंदर यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी केडीसीएचे अध्यक्ष आमदार जगन्नाथ शिंदे, मदन पाटील, शिवाजी ढेंगे, प्रल्हाद खवरे, भरंतेश कळंबे, अशोक बोरगावे, सचिन पुरोहित, भुंजिंगराव भांडवले, संदिप मिसाळ आदि मान्यवर सर्व संचालक मंडळ व जिल्हातील सर्व केमिस्ट असोसिएशनचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. अनिल देसाई यानी अडकूर येथे रुग्णांना दिलेल्या उत्कृष्ठ सेवेबद्दल हा पुरस्कार देण्यात आला असल्याने अनिल देसाई यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.
No comments:
Post a Comment