पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस सेवा पंधरवड्यानिमित्त भाजपच्या वतीने मंगळवारी चंदगड येथे मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन - चंदगड लाईव्ह न्युज

25 September 2022

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस सेवा पंधरवड्यानिमित्त भाजपच्या वतीने मंगळवारी चंदगड येथे मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन

पंतप्रधान नरेंद्र मोदी


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

      भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस सेवा पंधरवड्यानिमित्त चंदगड तालुका भाजप, धन्वंतरी अर्बन व स्वराज्य मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल गडहिंग्लज यांच्या वतीने मंगळवार २७ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी १० ते ३ या वेळेत भारतीय जनता पार्टी कार्यालय पंचायत समिती रोड चंदगड येथे मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे.

          महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत विनामूल्य महा आरोग्य शिबिर आयोजित केले आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२२ रोजी सेवा पंधरवडा साजरा केला जात आहे. यानिमित्त या शिबाराचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी राज्यमंत्री भरमूआण्णा पाटील यांच्या हस्ते होईल. तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी भाजपा राज्य कार्यकारणी सदस्य शिवाजीराव पाटील असतील.         

            या शिबिरामध्ये तज्ञ डॉक्टरांच्या कडून तपासणी व मार्गदर्शन केले जाणार असून यामध्ये ब्लड शुगर, इसीजी, पोटाचे विकार,,हाडांचे विकार तसेच लहान मुलांची मोफत तपासणी केली जाणार आहे. शिबिराला अस्थिरोग तज्ञ डॉ. अजित पाटोळे, जनरल मेडिसिन डॉ. अमर भगवान पाटील व जनरल सर्जन डॉ.  नंदकिशोर सैदानी त्यांच्याकडून रुग्णांची तपासणी होणार आहे. या शिबिराचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन भाजपच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment