हेरे सरजांम प्रकरणी चंदगड तालुक्यातील शेतकऱ्यांची अडवणूक, त्रस्त शेतकऱ्यांनी दिले मंडल अधिकाऱ्यांना निवेदन - चंदगड लाईव्ह न्युज

24 September 2022

हेरे सरजांम प्रकरणी चंदगड तालुक्यातील शेतकऱ्यांची अडवणूक, त्रस्त शेतकऱ्यांनी दिले मंडल अधिकाऱ्यांना निवेदनचंदगड / सी. एल. वृत्तसेवा

 हेरे सरंजाम प्रकरणी जमिनीची भूधारणा पध्दत भोगवाटदार वर्ग -२ मधून भोगवाटदार वर्ग १ मध्ये करून शेतकऱ्यांची अडवणूक न करता शेतकऱ्यांना दिलासा दयावा , अशी मागणी अडकूर परिसरातील शेतकऱ्यांनी नागनवाडी येथील मंडल अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे .         प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे वर्ग -२ च्या वर्षानुवर्षे कसत असलेल्या जमिनींचा खरेदी - विक्री व्यवहार , कर्ज काढता येत नाही . त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रगतीत अडसर ठरणारा हेरे सरंजामचा प्रश्न निकालात काढून वर्ग -२ च्या जमिनी वर्ग १ करण्यासंबंधी बरीच कागदपत्रे याअगोदर शासनाकडे सादर केली आहेत . त्याची दोनशेहे पट रक्कम सुध्दा अदा केली आहे . तरी सुध्दा ही प्रकरणे निकालात न काढता गरिब शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचे काम प्रशासनाकडून चालू केलेआहे . प्रशासनाने दिलेल्या नोटीसीतील कागदपत्रे , उतारे महसूल खात्यातच मिळतात . पण ती शेतकऱ्यांना वेळेत मिळत नाहीत . तरी तक्तालीन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या आदेशानुसार उत्तारे व इतर कागदपत्रांची पाहणी करून वर्ग -२च्या जमिनी वर्ग –१ करून देण्याचे ठरले होते . त्यानंतर बाकीचा भाग नागनवाडी सोडून इतरत्र जमिनी वर्ग -१ झाल्या आहेत . तरी त्याचप्रमाणे नागनवाडी विभागातील सर्व जमिनी वर्ग -१ करून दयाव्यात , अशी मागणी उपसरपंच अनिल कांबळे , तुकाराम देसाई , गोविंद देसाई , नितिन दळवी , रमेश देसाई , सचिन गुरव , गणपत बामणे , धोंडीबा कांबळे , दत्तात्रय निकम , शिवाजी देसाई, पाडुरंग कदम,आप्पा घोळसे,राजाराम घोरपडे,दिलीप भेकणे,सुरेंद्र आर्दाळकर,महादेव शिवनगेकर,संजय देसाई, गंगाधर कापसे आदी शेतकऱ्यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment