हलकर्णी महाविद्यालयात सचेतना मंडळामार्फत विद्यार्थीनींना मार्गदर्शन कार्यक्रमात स्वागत करताना प्राचार्य. |
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
हलकर्णी (ता. चंदगड) येथील दौलत विश्वस्त संस्थेच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील सचेतना मंडळामार्फत विद्यार्थीनींना मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. डी. अजळकर उपस्थित होते.
प्रारंभी मान्यवरांचे स्वागत डॉ. जयश्री पाटील यांनी केले व प्रास्ताविकातून त्यांनी कार्यक्रमाचा हेतू विशद केला. यावेळी व्यासपीठावर डॉ. जे. जे. व्हटकर, सौ. व्ही. जी. केळकर व आदी मान्यवर उपस्थित होते. सर्व मान्यवर मंडळींनी महाविद्यालयातील विद्यार्थीनींना सखोल मार्गदर्शन केले. आपल्या जीवनात आपण ध्येय, चिकाटी, कष्ट करण्याची जिद्द ठेवून विविध क्षेत्रात यश मिळवावे असे सांगितले . प्राचार्य डॉ. बी. डी. अजळकर, प्रा. डॉ. जे. जे. व्हटकर, सौ. व्ही. जी. केळकर, हर्षदा सावरे यांनी विद्यार्थीनींना मार्गदर्शन केले. या प्रसंगी माधुरी पाटील, माया पाटील, हर्षदा सावरे सर्व महाविद्यालयीन विद्यार्थीनी मोठया संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment