ज्ञानार्जनाबरोबरच शिस्तीचे महत्व समजून घ्या - प्राचार्य डॉ. अजळकर - चंदगड लाईव्ह न्युज

24 September 2022

ज्ञानार्जनाबरोबरच शिस्तीचे महत्व समजून घ्या - प्राचार्य डॉ. अजळकर

शिस्तपालन कार्यक्रमात बोलताना प्राचार्य डॉ. अजळकर

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

      “आपले वर्तन महाविद्यालयाच्या परिसरात शिस्तबद्ध असावे ज्ञानसंपदानाबरोबरच व्यक्तिमत्व विकास साधण्यासाठी विद्यार्थी जीवनात शिस्तीची सवय अंगीकारावी. महाविद्यालयाने तयार केलेल्या कोड ऑफ कंडक्टचे पालन सर्वांनी काटेकोरपणे करावे". असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. बी. डी. अजळकर यांनी केले. यशवंतराव चव्हाण महाविद्यालय हलकर्णी येथील कोड ऑफ कंडक्ट कमिटीच्या वतीने शिस्तपालन बद्दल कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. 

          प्रास्ताविक शारीरिक शिक्षण संचालक प्रा. अर्जुन पिटुक यांनी केले. स्वागत कोड ऑफ कंडक्ट कमिटीचे प्रमुख प्रोफेसर डॉ. आय. आर. जरळी यांनी केले तसेच विद्यार्थी व विद्यार्थिनींना शिस्तीचे पालन कसे करावे याबद्दल त्यांनी सखोल मार्गदर्शन केले. यावेळी प्रा. ए. एस. बागवान यांनीही महाविद्यालयाचे कोड ऑफ कंडक्ट बद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली आपले जीवन चांगले जगण्यासाठी शिस्त नेहमी महत्त्वाची असते असे सांगितले. यावेळी प्रा. डॉ. आय आर जरळी व प्रा. ए. एस. बागवान रसायनशास्त्र विभाग प्रमुख यांनी मनोगत व्यक्त केली. या कार्यक्रमासाठी सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनीं मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचालन डॉ. एन. सी. हिरगोंड यांनी केले तर आभार प्रा. व्ही. व्ही. कोलकार यांनी मानले.

No comments:

Post a Comment