![]() |
कोवाड केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेत मार्गदर्शन करताना विजय पाटील सोबत केंद्रप्रमुख मुतकेकर केंद्र मुख्याध्यापक श्रीकांत पाटील, मार्गदर्शक युवराज पाटील व संतोष सूर्यवंशी |
कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
कोवाड केंद्रांतर्गत तिसरी केंद्रस्तरीय शिक्षण परिषद श्री नरसिंह हायस्कूल निट्टूर ता. चंदगड येथे पार पडली. अध्यक्ष स्थानी केंद्रप्रमुख सुधीर मुतकेकर हे होते.
दिपप्रज्वलन नरसिंह हायस्कूलचे मुख्याध्यापक एस. टी. खणगुतकर यांच्या हस्ते झाले. केंद्र समन्वयक विलास पाटील यांनी प्रास्ताविक केले. यावेळी उपस्थित पहिली ते आठवीच्या सर्व प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांना तज्ञ मार्गदर्शक विजय पाटील यांनी माता पालक संघ स्थापना कार्य याबद्दल, युवराज पाटील यांनी नवोपक्रम विषयावर तर संतोष सूर्यवंशी यांनी निपुण भारत व नवीन शैक्षणिक धोरण याबद्दल मार्गदर्शन केले. केंद्र मुख्याध्यापक श्रीकांत वैजनाथ पाटील यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment