गोपाळराव पाटील यांची राष्ट्रीय काँग्रेसच्या प्रदेश कमिटीवर निवड - चंदगड लाईव्ह न्युज

24 September 2022

गोपाळराव पाटील यांची राष्ट्रीय काँग्रेसच्या प्रदेश कमिटीवर निवड

गोपाळराव मोतीराम पाटील

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

           दौलत कारखान्याचे माजी अध्यक्ष गोपाळराव मोतीराम पाटील यांची राष्ट्रीय काँग्रेसच्या महाराष्ट्र कमिटीच्या प्रदेश सदस्यपदी कोल्हापूर जिल्ह्यातून निवड करण्यात आली. जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्या शिफारशींने प्रदेश निवडणूक अधिकारी पल्लम राजू यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या नवनिर्वाचित प्रदेश प्रतिनिधींची बैठक पार पडली. या बैठकीला प्रदेश प्रभारी एच. के. पाटील , प्रदेशाध्यक्ष नाना पटोले,आ. अशोक चव्हाण आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment