चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
हारूर (ता. आजरा) येथील शिवतेज कला, क्रिडा, सांस्कृतिक व शैक्षणिक तरुण मंडळामार्फत यांच्या आयोजित केलेल्या खुल्या संगित भजन स्पर्धेत अडकूरच्या रवळनाथ संघाने प्रथम क्रमांक पटकाविला. तर गडहिंग्लज येथील सप्तसुर संघाने दुसरा, आमरोळीच्या श्री भावेश्वरी भजनी मंडळाने तृतीय क्रमांक, तर अल्लुबाई भजनी मंडळ अलबादेवी (धुरी) परिवार यांच्या संघाने चौथा क्रमांक पटकाविला.
या भजन स्पर्धेत परिक्षक म्हणून एस. एम. तोडकर (आजरा) आणि डॉ. कृष्णा होंरबळे (हाजगोळी) यांनी काम पाहिले. विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम व विजेत्या स्पर्धक संघांना कै. तुळसाबाई ज्ञानदेव सांवत यांच्या स्मरणार्थ कु. सक्षम संदीप सावंत यांच्याकडून आकर्षक सन्मानचिन्ह देण्यात आले होते.
सुत्रसंचालन प्रा. स्वप्नील आर्दाळकर यांनी केले. स्पर्धा यशस्वी रित्या पार पाडण्यासाठी नितीन घेवडे, मनोहर सावंत, ओमकार पालकर, सामिर पाथरवट यांच्यासह मुंबई ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले.
No comments:
Post a Comment