दुंडगे येथे खाद्य व रानभाज्या प्रदर्शन महोत्सव उत्साहात संपन्न - चंदगड लाईव्ह न्युज

23 September 2022

दुंडगे येथे खाद्य व रानभाज्या प्रदर्शन महोत्सव उत्साहात संपन्नतेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

 कुमार विद्या मंदिर दुंडगे (ता. चंदगड) या शाळेमध्ये  सही पोषण देश रोशन पोषण आहार मास या उपक्रमाअंतर्गत " खाद्य व रानभाज्या प्रदर्शन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले.

 यावेळी शालेय विद्यार्थ्यानी परिसरात सापडणाऱ्या विविध प्रकारच्या औषधी रानभाजांचे संकलन करून त्याची प्रदर्शनामध्ये खूप चांगल्या पद्धतीने मांडणी केली. प्रदर्शनास भेट देण्यासाठी आलेल्या प्रत्येक नागरिकास या भाज्यांचे महत्व विद्यार्थी समजावून सांगत होते . यावेळी विविध खाद्य पदार्थांचे प्रदर्शनही भरवण्यात आले. यासाठी शाळेतीत सौ. सुवर्णा  आंबेवाडकर, गोविंद कांबळे ,पा. रा. पाटील , सागर खाडे ,विनोदकुमार चव्हाण या शिक्षकांनी योग्य नियोजन केले . तर शालेय व्यवस्थापन समितीचे सौ सुनंदा बामणे , लक्ष्मण पाटील , विष्णू पाटील , सौ . जान्हवी पाटील , सौ नम्रता पाटील आदि जनानी विद्यार्थी व विद्यार्थिनींचे कौतुक केले .बालचमूंना प्रेरणा देण्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीअध्यक्ष, सर्व सदस्य  व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


No comments:

Post a Comment