दौलत संचिलत अथर्व कारखान्याच्या कामगारांचा संपावर निघाला अखेर तोडगा, काय झाल्या वाटाघाटी.......वाचा सविस्तर........ - चंदगड लाईव्ह न्युज

23 September 2022

दौलत संचिलत अथर्व कारखान्याच्या कामगारांचा संपावर निघाला अखेर तोडगा, काय झाल्या वाटाघाटी.......वाचा सविस्तर........

कोल्हापूर : जिल्हाधिकारी कार्यालयात कामगार व कारखाना व्यवस्थापन यांच्या बेठकीवेळी उपस्थित कामगार व कारखाना व्यवस्थापन.

कोल्हापूर / सी. एल. वृत्तसेवा

              हलकर्णी (ता. चंदगड) येथील दौलत अथर्व च्या कामगारांच्या गेल्या ३५दिवसापासून सुरू असलेल्या संपावर आज जिल्हाधिकारी कार्यालयात अप्पर जिल्हाधिकारी किशोर पवार यांच्या मध्यस्थीने तोडगा काढण्यात आला. सध्याचा असणारा कामगारांचा पगार व शासनाच्या नियमाप्रमाणे १एप्रिल २०१९ चा वाढीव पगार, या पगारामधील फरकाच्या ५० % इतकी रक्कम पुढच्या वर्षभरासाठी दरमहा कामगारांना वाढ करून देण्यात यावे असे सुचवण्यात आले. यावर कामगार संघटना, अथर्व प्रशासन यांच्यामध्ये एकमत झाले आणि अखेर कामगारांचा संप मिटला.

          अप्पर जिल्हाधिकारी पवार यानी घेतलेल्या कठोर भूमिकेनंतर या संपावर तोडगा निघाला. कोल्हापूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात अप्पर जिल्हाधिकारी किशोर पवार यांच्या अध्यक्षतेखाली कामगार संघटना व अथर्व व्यवस्थापन यांची बैठक झाली.प्रारंभी कामगार संघटनेचे अध्यक्ष प्रा.सुभाष जाधव यांनी कामगारांची बाजू मांडली. अथर्व कंपनीकडून मानसिंग खोरटे यांनी बाजू मांडली. दोन्ही बाजू समजून घेतल्यानंतर अप्पर जिल्हाधिकारी किशोर पवार यांनी तोडगा सुचवला पण खोराटे आपल्या २५% पगारवाढीच्या भूमिकेवर ठाम राहिले. यामध्ये बराच उशिरापर्यंत तोडगा निघाला नाही. वादावादीचा प्रसंग निर्माण झाला. शेवटी अप्पर जिल्हाधिकारी पवार आपला निर्णय सांगून बैठकीतुन निघून गेले.थोड्या वेळाने शिवसेनेचे विजय देवणे यांनी विनंती करून अप्पर जिल्हाधिकारी पवार यांना बैठकीत परत आणले.

          यावेळी अप्पर जिल्हाधिकारी पवार यानी सुचविलेला तोडगा अथर्व कंपनीचे मानसिंग खोराटे मान्य करत नव्हते.तसेच बैठकीत चर्चेदरम्यान खोराटे यांनी चुकीचे मत मांडल्यामुळे पवार यांनी केडीसीसी बँकेच्या अधिकाऱ्यांना अथर्व कंपनीचे ४० कोटी जप्त करण्याचे आदेश दिले. या गुगलीनंतर मात्र खोराटे यांनी तोडगा मान्य केला आणि बैठक यशस्वी झाली. या बैठकीमध्ये आमदार राजेश पाटील,माजी मंत्री भरमुअण्णा पाटील,गोपाळराव पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे,संग्राम कुपेकर,प्रा.आबासाहेब पाटील, बळीराजा संघटनेचे नितीन पाटील,गणेश फाटक,सिध्दार्थ शिंदे,अशोक जाधव,संजय पाटील, यांच्यासह सर्वपक्षीय नेते,कामगार  व पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment