जातीय द्वेषातून विद्यार्थ्यांची हत्या करणाऱ्या राजस्थानमधील त्या शिक्षकाला फाशी द्या - ब्लॅक पॅथरचा चंदगड तहसीलवर मोर्चा - चंदगड लाईव्ह न्युज

05 September 2022

जातीय द्वेषातून विद्यार्थ्यांची हत्या करणाऱ्या राजस्थानमधील त्या शिक्षकाला फाशी द्या - ब्लॅक पॅथरचा चंदगड तहसीलवर मोर्चाचंदगड / प्रतिनिधी
        राजस्थान मधील जालोर जिल्हयातील सुराणा येथील इंद्रकुमार मेघवाल या शालेय विद्यार्थ्यांने माठातील पाणी प्यायल्यामुळे जातीयव्देषातून शाळकरी मुलाची हत्या करणाऱ्या विकृत शिक्षकाला मरेपर्यंत फाशीची शिक्षा द्यावी या . 
मागणीसाठी आज चंदगड तहसील कार्यालयावर ब्लॅक पँथर च्या वतीने मोर्चा काढण्यात आला.मागणीचे निवेदन तहसीलदार विनोद रणवरे यानी देण्यात आले.

भारत देश स्वातंत्र्याच्या ७५ व्या म्हणजेच सुवर्णमहोत्सवी वर्षात पदापर्ण करत असताना इंद्रकुमार मेघवाल या शालेय विद्यार्थ्यांने माठातील पिण्याचे पाणी प्यायल्यामुळे नराधम , जातीयवादी , धर्माच विकृत अशा निचप्रवृत्तीच्या शिक्षकाने संबंधित विद्यार्थ्याला बेदममारहाण करून त्याची हत्या केली. भारतीय संविधानाने दिलेल्या स्वातंत्र्य,समता,न्याय,बंधुता या नैतिक मुल्यांचा विसर पडलेल्या या नराधम शिक्षकाला मरेपर्यंत फाशीची शिक्षा झाली पाहिजेत . एवढेच नाहीतर एवढी मोठी घटना घडून देखील राजस्थान मधील गहलोत सरकारने याबाबत साधी दिलगिरीही व्यक्त केली नाही . म्हणून राजस्थान सरकार , मुख्यमंत्री अशोक गहलोत व संबंधीत शिक्षकाचा ब्लॅक पॅथर पक्ष जाहिर निषेध करत आहे. परंतु या घटनेमुळे देशात आजही जातीयवाद जिवंत आहे हे सिध्द होते . अशा प्रवृतिचा बिमोड मुळासकट नष्ट होणे गरजेचे आहे . ही हत्या केवळ इंदकुमार मेघवाल या विद्यार्थ्यांची नसून भारत सरकार , राजस्थान सरकार , मानवी समुह ,भागासवर्गीय समाज , समाज सुधारक आणि देशातील महापुरुष व त्यांच्या विचारांची तसेच १५ ऑगस्ट १ ९ ४७ रोजी मिळाले स्वांताय व २६ नोव्हेंबर १ ९ ४ ९ रोजी डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या भारतीय संविधानाचे आहे.मागासवर्गीयावर होणारा अन्याय आणि अत्याचार केंद्र आणि देशातील राज्यसरकार यांना थांबवता येत नसेल तर एकेकाळी विश्वरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांनी दलितांसाठी स्वतंत्र मतदार संघाची मागणी केली होती . तीच मागणी आम्ही आता ब्लॅक पॅथर पक्षाच्यावतीने करत आहोत . याची गंभीर दखल घेवून एस.सी. एस.टी , ओ.बी.सी. व्ही.जे.एन.टी. आदि मागासवर्गीय समाजाना स्वतंत्र मतदार संघ देण्यात यावा . घडलेल्या या सर्व घटनांमुळे भारताची अब्रू जगाच्या वेशीवर टांगली जात आहे . त्यामुळे पुन्हा अशा माणुसकीला काळीमा लावणाच्या घटना देशांत घडू नयेत यासाठी सदर गुन्हयाचा खटला फास्टट्रक कोर्टात चालवून संबंधित विकृत शिक्षकाला मरेपर्यंत फाशीची शिक्षा द्यावी . तसेच राजस्थान मधील गेहलोत सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करावी.यावेळी तालुकाध्यक्ष दीपक कांबळे ,महिला तालुकाध्यक्ष प्रियांका शिंदे,गोकुळचे माजी संचालक नामदेव कांबळे, पंडीत कांबळे,आनंदा दळवी, राजू कांबळे शंकर कांबळे,सुरज कांबळे,दिनकर चौगुले,दीपा बालगोपाल, सावित्रीबाई बालगोपाल, विलास कांबळे,प्रल्हाद मोरे रामचंद्र पाटील आदीसह महिलावर्ग मोठ्या प्रमाणात मोर्चात सहभागी झाला होता.


No comments:

Post a Comment