चंदगड तालुक्यात गौरी-गणपतीचे भक्तिमय वातावरणात विसर्जन - चंदगड लाईव्ह न्युज

05 September 2022

चंदगड तालुक्यात गौरी-गणपतीचे भक्तिमय वातावरणात विसर्जन

 

नदी काठावर गौरी गणपतीचे विसर्जन करताना भक्तगण.

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा 

       चंदगड तालुक्यात आज गणेश उत्सवाची सांगता आज घरगुती गौरी-गणपतीचे विसर्जन करून झाली. चंदगड तालुक्यात गणेश भक्तानी ताम्रपर्णी व घटप्रभा नदीत गणेश मुर्तीचे विसर्जन केले. काही मंडळानी निर्माल्या नदीत न टाकता एकत्र जमा केले.            

       कानूर, गवसे, म्हांळूगे, हिंडगाव, इब्राहिमपूर, सावर्डे, अडकूर येथील नागरिकांनी घटप्रभा नदीत तर झांबरे ,उमगाव, चंदगड, नागनवाडी, दाटे, माणगाव, डुक्करवाडी, म्हाळेवाडी, निट्टूर, कोवाड, दुंडगे, कूदनूर, चिंचणे, कामेवाडी, राजगोळी येथील नागरिकांनी ताम्रपर्णी नदीत गणेश विसर्जन केले. पावसाने उघडीप दिल्याने बालचमूनी गणेशोत्सवाचा आनंद लुटला.No comments:

Post a Comment