पंचवीस टक्के पगारवाढ हि अथर्वने केलेली कामगार व जनतेची दिशाभूल - अथर्व- दौलत कामगार पत्रकार परिषदेत प्रा. जाधव यांचा खुलासा - चंदगड लाईव्ह न्युज

04 September 2022

पंचवीस टक्के पगारवाढ हि अथर्वने केलेली कामगार व जनतेची दिशाभूल - अथर्व- दौलत कामगार पत्रकार परिषदेत प्रा. जाधव यांचा खुलासा

 


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

हलकर्णी ता. चंदगड येथील अथर्व-दौलत साखर कारखान्याच्या कामगारांनी आपल्या न्याय हक्कासाठी १९ऑगस्ट पासून बेमुदत काम  बंद आंदोलन सुरू केले आहे. याबाबत जिल्हा अधिकारी रेखावर यांनी दिलेले आदेश न पाळता २५ टक्के पगार वाढ करू असे कंपनी प्रशासनाने सांगितले आहे. पण हि घोषणा कामगारांची आणि चंदगडच्या शेतकरी व जनतेमध्थे दिशाभूल करणारी आहे. असे प्रतिपादन सिटू युनियनचे अध्यक्ष कॉम्रेड प्रा. सुभाष जाधव यांनी केले. ते पाटणे फाटा (ता. चंदगड) येथे आयोजित केलेल्या  पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

प्रारंभी प्रास्ताविक अनिल होडगे यांनी केले. या पत्रकार परिषदेत बळीराजा शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष नितीन पाटील, सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग बेनके, सरपंच विष्णु गावडे कामगार उपस्थित होते. स्वागत अशोक वरपे यांनी केले.

    प्रा. जाधव पुढे म्हणाले, काल झालेल्या बैठकीत त्रिसूत्री कराराप्रमाणे पुढील चर्चा करून आंदोलन मागे घावे असे सांगितले होते. पण अथर्व प्रशासन मूळ वेतन वाढ ,सेवाशर्ती यावर चर्चा न करता केवळ २५ टक्के पगार वाढ सांगत आहे. पण हि पगारवाढ नेमक्या कोणत्या पगारात वाढ केली आहे.म्हणजे सध्या देत असलेल्या म्हणजे २०११च्या पगारात की २०१४ व २०१९ च्या त्रिपक्षीय करारानुसार होणाऱ्या पगारात करणार, ही पगारवाढ किती वर्षात देणार, या पगारवाढीत कामगारांची कपात केलेली ३०००रू.समाविष्ट आहेत काय?याबाबत अथर्व व्यवस्थापनाने खुलासा करावा अशी कामगार युनियनची मागणी करूनही याबाबत त्यानी काहीच व्यक्त केलेले नाही.

         त्यामुळे हि पगारवाढ कशी केली ? कोणत्या मुद्यावर केली याचा तपशील जाहीर करावा याची कामगारांना माहिती द्यावी आणि जिल्हा अधिकारी यांच्या आदेशाप्रमाणे त्रिसूत्री करार व्हावा अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे. कामगारांनी गळीत हंगामाच्या दोन महिने आधी संप केला आहे. याचे कारण की हंगामपूर्वी कामगारांच्या प्रश्नांची उकल व्हावी, कारखाना सुरळीत चालू व्हावा पण कारखाना प्रशासन सिटू युनियन हे कारखाना बंद करण्यासाठी आले आहेत असा आरोप करत आहेत हे कितपत योग्य आहे. असे वागणे, बोलणे म्हणजे कामगार व युनियन यात दुफळी माजवून आपली पोळी लाटण्याचे काम आहे हे कामगारांच्या लक्षात आले आहे.कामगारांचे मूळ वेतन लपवून देय देणी लपवून,मुख्य विषयाला फाटा देऊन केवळ जनतेची दिशाभूल करण्याचे काम अथर्व प्रशासन करत असल्याचे हि सांगितले.त्यामुळे त्रिसूत्री करार होत नाही यावर चर्चा होत नाही. तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही . जनतेमध्ये झालेला गैरसमज दूर करण्यासाठी मंगळवार पासून रॅली काढून गावागावात माहिती पत्रके वाटणार असल्याचे सांगितले. जेणेकरून नेमका विषय लोकांना समजेल कारण केवळ कंपनी हितासाठी कामगार यांना वेठीला धरून कामगार आणि युनियन दोषी असल्याचा आरोप केला जात आहे. 

      त्यामुळे कंपनी प्रशासनाने योग्य चर्चेसाठी पुढाकार घ्यावा आणि त्रिसूत्री कराराप्रमाणे चर्चा करावी असे सांगितले.संप करणे हा कामगारांचा हक्क आहे. कोणी बाहेरून कामगार येत असतील तर त्यांना आम्ही आमची भूमिका समजावू व 25% पगार वाढ हि केवळ ठराविक कामगारांसाठी आहे. तीन वर्षांमध्ये शासनाचे नियम धाब्यावर बसवून हि वाढ देण्याचा कंपनी प्रशासनाचा घाट आहे.कामगारांनी आपल्या मागण्या न्याय मार्गाने मंजूर करून असे  अध्यक्ष प्रदीप पवार यांनी सांगितले.







No comments:

Post a Comment