चंदगड नगरपंचायतीच्या तीन पथकांकडून गणेशमुर्ती व निर्माल्य संकलन - चंदगड लाईव्ह न्युज

06 September 2022

चंदगड नगरपंचायतीच्या तीन पथकांकडून गणेशमुर्ती व निर्माल्य संकलन

चंदगड नगरपंचायतीला नागरीकांना गणेशमुर्ती व निर्माल्य दान केले.

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

     चंदगड नगरपंचायतीच्या वतीने मुख्याधिकारी स्वरूप खारगे यांचे मार्गदर्शनाखाली चंदगड  शहरात  एकूण ३ ठिकाणी गणेश मूर्ती व निर्माल्य  स्वीकारणेस कृत्रिम कुंड व पथके तयार करणेत आली होती. सदर ३ ठिकाणी सायकाळी ७ वाजेपर्यंत ३० च्यावर मूर्ती उस्फूर्तपणे नागरिकांनी दान करून पर्यावरण पूरक गणेश विसर्जनास  प्रतिसाद दिला आहे. तसेच दिवसभरात ०.५ टन निर्माल्य नगरपंचायतीने संकलन केले आहे. या कामी नगरपंचायतीने ३ पथके तयार करून सर्व खात्याचे अधिकारी कर्मचारी नेमले होते. नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत केले. या उपक्रमाला नागरीकांकडून चांगला प्रतिसाद मिळाल्याचे चंदगड नगरपंचायतीचे मुख्याधिकारी श्री. खारगे यांनी सांगितले. 

No comments:

Post a Comment