कुर्तनवाडी येथे सार्वजनिक हालता देखाव्याचं उद्घाटन, कोणता आहे हा देखावा......... - चंदगड लाईव्ह न्युज

06 September 2022

कुर्तनवाडी येथे सार्वजनिक हालता देखाव्याचं उद्घाटन, कोणता आहे हा देखावा.........

कुर्तनवाडी (ता. चंदगड) येथे सार्वजनिक हालत्या देखाव्याच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना माजी. जि. प. सदस्य सचिन बल्लाळ. शेजारी मंडळाचे कार्यकर्ते.


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

        कुर्तनवाडी (ता. चंदगड) येथे जय हनुमान कला क्रीडा व सांस्कृतिक  सार्वजनिक गणेशोत्सव मंडळामार्फत कालिया मर्दन या हलत्या देखाव्याचं उद्घाटन माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन बल्लाळ यांच्या हस्ते करण्यात आलं आहे. श्रीगणेशा अवॉर्ड विजेतं जय हनुमान कला क्रीडा व सांस्कृतिक  सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने या अगोदर ही दौलत, माळीण गाव दुर्घटना अशा अनेक वस्तूस्तिती वर भाष्य करणारा हलता देखावा केला होता.  यानंतर कोविड काळात अनेक निर्बंधात गणेश उत्सव साजरा केल्यानंतर यंदा दोन वर्षानंतर पुन्हा एकदा मोठ्या उत्साहात गणेश उत्सव साजरा केला जात आहे. याचं पार्श्वभूमीवर  यावर्षी कुर्तनवाडी येथे कालिया मर्दन हलता देखाव्याचं उद्घाटन करण्यात आलं असून भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्रीचं दर्शन घेण्याचे आवाहन मंडळामार्फत करण्यात आलं आहे.

No comments:

Post a Comment