संस्काराने समाज घडतो - संजय साबळे, वाटंगी येथे कार्यक्रम - चंदगड लाईव्ह न्युज

06 September 2022

संस्काराने समाज घडतो - संजय साबळे, वाटंगी येथे कार्यक्रम

हळदी-कुंकु महिला मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना संजय साबळे.

चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

          "ज्याला संस्कारी आई वडील मिळाले तोच खरा भाग्यवान. आपल्या मुलांवर जीवापाड प्रेम करतानाच त्याला कष्टाची आणि परिस्थितीची जाणीव करुन दया. मुलं जन्माअगोदर पासून आईच्या सहवासात असतात. म्हणून आई हेच मुलाचे पहिले संस्कार पीठ असते. स्त्रीच खऱ्या अर्थाने कुदुंब, समाज घडवित असते. आईने मुलीची मैत्रिण आणि बापान मुलाचा मित्र झाल्यास घराला घरपण येईल. पण दुर्दैवाने मोबाईल मुळे  हा घरातला संवाद हरवला आहे. " असे प्रतिपादन संजय साबळे यांनी केले.

समोर उपस्थित महिला.

       वाटंगी (ता. आजरा) येथील सार्वजनिक गणेश मंडळाला पंचवीस वर्षे पूर्ण झालेल्या हळदी कुंकु महिला मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून 'मना घडवी संस्कार' या विषयावर बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उत्तम जाधव होते. कार्यक्रमाला मधू जाधव, रविंद्र पवार, विलास कसलकर,उदय जाधव' शशीकांत थोरवत, मानसी जाधव, हौसाबाई जाधव ग्राम पंचायत सदस्य शोभा देसाई व बहुसंख्येने महिला वर्ग उपस्थित होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय पवार यांनी केले.

No comments:

Post a Comment