विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटक आमदार राजेश पाटील उपस्थित विद्यार्थी शिक्षकांना मार्गदर्शन करताना. |
कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
सन २०२१-२२ मधील ४९ वे चंदगड तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन व विज्ञान नाट्य महोत्सव २०२२-२३ उत्साहात संपन्न झाला. महात्मा फुले विद्यालय कारवे येथे शिवाजी जोतिबा तुपारे सरपंच कारवे यांच्या अध्यक्षतेखाली चंदगड चे आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. यावेळी गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे, गटशिक्षणाधिकारी सौ एस एस सुभेदार, खेडूत शिक्षण मंडळाचे सचिव प्रा. आर पी पाटील यांनी मनोगते व्यक्त केली. केंद्रप्रमुख जी बी जगताप व बाळू प्रधान यांनी नियोजन केले.
विज्ञान प्रदर्शनात माध्यमिक गट इयत्ता नववी ते बारावी, उच्च प्राथमिक स्तर इयत्ता सहावी ते आठवी त्याचबरोबर प्राथमिक शिक्षकांची शैक्षणिक साधने, माध्यमिक शिक्षकांची शैक्षणिक साधने, प्रयोगशाळा सहाय्यक यांची शैक्षणिक साधने अशा विभागात स्पर्धा पार पडली. प्रदर्शनास शिक्षक व विद्यार्थी स्पर्धकांचा मोठा प्रतिसाद लाभला परिसरातील विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनी प्रदर्शनात मांडलेले वैज्ञानिक प्रयोग पाहण्यासाठी गर्दी केली होती.
उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी तानाजी गडकरी, धनाजी पाटील विनायक प्रधान, शिवाजी पाटील, गोविंद पाटील, एन व्ही पाटील, दस्तगीर उस्ताद आदींची उपस्थिती होती. प्राचार्य एम एम गावडे यांनी आभार मानले.
स्पर्धेतील प्रथम तीन क्रमांकाचे विजेते अनुक्रमे पुढील प्रमाणे माध्यमिक व उच्च माध्यमिक गट इयत्ता नववी ते बारावी- यशराज सुनील हळदणकर (न्यू इंग्लिश स्कूल चंदगड), प्रणाली संजय मोदगेकर (श्रीराम विद्यालय कोवाड), स्वाती अविनाश कांबळे (जयप्रकाश विद्यालय किणी). उच्च प्राथमिक स्तर इयत्ता सहावी ते आठवी गट प्राजक्ता विनायक कुंभार (श्रीराम विद्यालय कोवाड), कार्तिक संदीप निटूरकर (न्यू इंग्लिश स्कूल चंदगड), सृष्टी संदीप ढोकरे (हनुमान विद्यालय मांडेदूर्ग). प्राथमिक शिक्षकांची शैक्षणिक साधने गट- प्रशांत मारुती पाटील (विद्यामंदिर सरोळी), सरिता दत्तात्रय नाईक (विद्यामंदिर शिरोली), रेखा अशोक गायकवाड (केंद्र शाळा तुडिये). माध्यमिक शिक्षकांची शैक्षणिक साधने गट- दयानंद दत्तात्रय होणगेकर (दुंडगे हायस्कूल दुंडगे), गजानन रामू नांदूडकर (श्रीराम विद्यालय कोवाड), संजय अर्जुन पाटील (जनता विद्यालय तुर्केवाडी). प्रयोगशाळा सहाय्यक गट- किशोर वसंत पाटील (महात्मा फुले विद्यालय कार्वे), मधुकर गोपाळ तेजम (न्यू इंग्लिश स्कूल चंदगड) परशराम नरसू तरवाळ (जयप्रकाश विद्यालय किणी). विज्ञान नाट्योत्सव विभाग- विद्यामंदिर तडशीनहाळ, श्रीराम विद्यालय कोवाड, महात्मा फुले विद्यालय कार्वे. सर्व विजेत्यांना खेडूत शिक्षण मंडळाचे सचिव प्रा. आर पी पाटील व मान्यवरांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण करण्यात आले.
No comments:
Post a Comment