भारताच्या स्वातंत्र्यलढयातील आद्यक्रांतिकारक उमाजी नाईक यांचे योगदान श्रेष्ठ - डॉ. जाधव, हलकर्णी महाविद्यालयात राजे उमाजी नाईक जयंती साजरी - चंदगड लाईव्ह न्युज

07 September 2022

भारताच्या स्वातंत्र्यलढयातील आद्यक्रांतिकारक उमाजी नाईक यांचे योगदान श्रेष्ठ - डॉ. जाधव, हलकर्णी महाविद्यालयात राजे उमाजी नाईक जयंती साजरी

हलकर्णी महाविद्यालयात राजे उमाजी नाईक जयंती साजरी

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

        तळागळातील लोकांच्या उठावाचा महानायक म्हणजे राजे उमाजी नाईक होत.सर्व प्रथम कांतीचे स्वप्न पाहणारे महाराष्ट्रातील निधडया छातीचे वीर आद्यकांतिकारक म्हणजे नरवीर राजे उमाजी नाईक होत. देशासाठी सर्वस्व अर्पण केलेल्या कांतिकारकांचे स्मरण आणि त्यांचा आदर करणे कमप्राप्त आहे. राजे उमाजी नाईक कांतिकारकांचे दीपस्तंभ होत. छत्रपती शिवाजी महाराज हे उमाजी नाईक यांचे आदर्श होत. त्यातुन त्यांनी व्यापक स्वातंत्र्याची कल्पना मांडली. भारत देशाच्या स्वतंत्र अस्तित्वाची जाणीव करून देणारे पहिले कांतिकारक म्हणजे उमाजी नाईक होत . असे प्रतिपादन डॉ. मधुकर जाधव यांनी केले . कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. बी. डी. अजळकर होते. व्यासपीठावर नॅक समन्वयक डॉ. राजेश घोरपडे सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. चंद्रकात पोतदार, डॉ. आय. आर. जरळी उपस्थित होते. प्रास्ताविक  डॉ. ज्योती व्हटकर यांनी केले.

         डॉ. जाधव पुढे म्हणाले, ``भारतीय स्वातंत्र्यासाठी इंग्रजांशी पहिले बंड पुकारणारे श्रेष्ठ कांतिकारक म्हणजे उमाजी नाईक होत. उमाजी नाईक यांनी सामाजिक न्यायाच्या तत्वावर अधारीत स्वातंत्र्याची कल्पना मांडली. सहयादीच्या डोंगरकपारीत हिंदूस्थानच्या स्वातंत्र्याची कल्पना सर्वप्रथम उमाजी नाईक यांनी मांडली. ज्या ज्या वेळी त्यांना तुरूंगवासाची शिक्षा झाली त्या त्या वेळी त्यांनी आपला वेळ लिहिण्या वाचण्यात घालविला. आद्यकांतीकारक उमाजी नाईक यांच्या कार्याचा आढावा घेणे. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील उमाजी नाईक यांचे योगदान स्पष्ट करणे. आद्यकांतीकारक उमाजी नाईक यांचे कार्य आजच्या समाजाला समजण्याच्या हेतूने मांडणी करणे गरजेचे आहे असे सांगीतले. या कार्यक्रमासाठी डॉ . आय . आर . जरळी , प्रा . पी . ए . पाटील , प्रा . यु . एस  पाटील, प्रा. व्ही. व्ही. कोलकार, प्रा. के. एम. गोनुगडे, प्रा. एन. के. जावीर, जे. पी. पाटील, प्रा. सुवर्णा पाटील, युवराज रोड, अल्ताफ मकानदार , सुरज पाटील व विद्यार्थी उपस्थित होते. अभार डॉ. व्हटकर यांनी मानले.

No comments:

Post a Comment