अथर्व-दौलतचा साखर कारखाना बॉयलर अग्निप्रदिपन सोहळा संपन्न, कारखाना वेळेत सूरू करणार - मानसिंग खोराटे - चंदगड लाईव्ह न्युज

08 September 2022

अथर्व-दौलतचा साखर कारखाना बॉयलर अग्निप्रदिपन सोहळा संपन्न, कारखाना वेळेत सूरू करणार - मानसिंग खोराटे

अथर्व-दौलतचा साखर कारखाना बॉयलर अग्निप्रदिपन सोहळ्यावेळी उपस्थित मान्यवर.

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

   अथर्व दौलत साखर कारखान्याचा बॉयलर अग्निप्रदिपन कार्यक्रम  कारखान्याचे युनिट हेड आबासाहेब राजाराम पाटील व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. सुमन आबासाहेब पाटील यांच्या शुभहस्ते व कंपनीचे संचालक पृथ्वीराज खोराटे यांचे उपस्थितीत संपन्न झाला कारखान्याकडून मागील तीन गळीत उस गळीत हंगामामध्ये यशस्विरित्या गाळप हंगाम पुर्ण केले आहेत. कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मानसिंग खोराटे यांच्या कुशल नेतृत्वाखाली कारखान्याचे कामकाज व वाटचाल सक्षमपणे चालु आहे.                   यापूर्वी झालेल्या तीन हंगामातील ऊस बिले शेतकऱ्यांची व तोडणी वाहतुक कंत्राटदारांची बिले वेळेत अदा करुन कंपनी व्यवस्थापनाने ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केलेला आहे. सन २०२२-२३ गळीत हंगामाचे नियोजित वेळेत सुरु करण्यासाठी कारखान्यातील प्लांट मशीनरीची दुरुस्ती देखबालीची कामे प्रगतीपथावर असून कारखाना गळीतासाठी वेळेत सज्ज होत आहे. ऊस तोडणी वाहतुक करारातील यंत्रणा पूर्ण क्षमतेने भरली आहे. यावर्षी सात लाख मे. टन इतके गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. केंद्र शासनाचे पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाचे नवीन धोरणानुसार नवीन इथेनॉल प्रकल्प उभा केला असून, सदरचा प्रकल्प मागील गळीत हंगामापासून कार्यान्वीत झाला आहे. कारखान्याने यावर्षी कांही मशिनरीचे आधुनिकीकरण केले आहे. त्यामुळे गाळप क्षमता वाढणार आहे. कार्यक्षेत्रातील सर्व शेतकरी बांधवानी आतापर्यत चांगल्या प्रतिचा ऊस पुरवठा करुन सहकार्य केले आहेच. 

           तसेच यापूढेही असेच सहकार्य राहील. कारखान्याचे सर्व अधिकारी, कामगार यांनी चांगले काम करुन योगदान दिले आहे. त्याचप्रमाणे प्रतिकुल परिस्थितीत व आर्थिक अडचणीतून मार्ग काढून कारखाना उत्तमरित्या चालविणे व गाळप हंगाम यशस्विरित्या पार पाडणेस कंपनी कटिबध्द आहे असे व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले.याप्रंसगी कंपनीचे संचालक पृथ्वीराज खोराटे, विजय पाटील, इंजिनिअरिंग हेड पी. बी. पाटील, प्राडक्शन मॅनेजर ए. एल. साळुंखे, मुख्य शेती अधिकारी युवराज पाटील, एस. एन. गदळे, डीस्टीलरी मॅनेजर विजय पाटील, ए. ए. पाटील, एच आर मॅनेजर जी. एस. पाटील, परचेस मॅनेजर व्ही. एन. पाटील, चीफ फायनान्स ऑफिसर एस. जे. चव्हाण, सिव्हील इंजिनिअर डी. एस. शिंदे, इलेकट्रीकल मॅनेजर सुनील नाईक व इतर अधिकारी, उस उत्पादक शेतकरी व कर्मचारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment