करिअरसाठी योग्य नियोजन आवश्यक - डॉ. सदावर, यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात कार्यक्रम - चंदगड लाईव्ह न्युज

08 September 2022

करिअरसाठी योग्य नियोजन आवश्यक - डॉ. सदावर, यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात कार्यक्रम

यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात भौतिकशास्त्र विभागामार्फत आयोजित कार्यक्रमात बोलताना - डॉ. सदावर

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

        विद्यार्थ्यांनी आपल्या क्षमता ओळखून आपल्या आवडत्या क्षेत्रात करिअरच्या संधी निवडाव्यात. आपली स्वप्ने साध्य करण्यासाठी लक्ष केंद्रित करावे. आपले आई-वडील व गुरु यांच्याकडून प्रेरणा घेऊन आपली स्वप्ने पूर्ण करावीत. आयुष्यात नवीन शिकण्याची वृत्ती, योग्य प्रयत्न, आत्मविश्वास आणि नियोजन असेल तर आपण आपल्या आवडत्या क्षेत्रात करिअर करू शकतो असे मत डॉ. श्रीकांत सदावर यांनी व्यक्त केले. ते यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात भौतिकशास्त्र विभागामार्फत आयोजित कार्यक्रमात बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. डी. अजळकर होते. 

            डॉ. राजेश घोरपडे यांनी प्रास्ताविक केले. भौतिकशास्त्र विषयातून डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाची पीएच. डी. संपादन केल्याबद्दल व पोस्ट डॉक्टरेट साठी साऊथ कोरिया येथे निवड झाल्याबद्दल महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी डॉ. श्रीकांत सदावर यांचा महाविद्यालयामार्फत सत्कार करण्यात आला. यावेळी सदावर यांनी आपला विद्यार्थीदशेपासूनचा प्रवास विद्यार्थ्यांसमोर उलगडला. आज उच्च शिक्षणाला महत्त्व आहे. विद्यार्थ्यांनी संशोधक म्हणून पुढे यावे व विकासाला हातभार लावावा, आत्मविश्वास व योग्य परिश्रमाच्या जोरावर आपण हे साध्य करू शकतो असे मत त्यांनी मांडले. यावेळी डॉ. जे. जे. व्हटकर, डॉ. चंद्रकांत पोतदार उपस्थित होते.

No comments:

Post a Comment