आसगाव मध्ये चंदन चोरांचा सुळसुळाट, रात्रीत लंपास केले चार चंदन वृक्ष - चंदगड लाईव्ह न्युज

12 September 2022

आसगाव मध्ये चंदन चोरांचा सुळसुळाट, रात्रीत लंपास केले चार चंदन वृक्ष

आसगाव येथे चंदन तस्करानी तोडलेले रामू गावडे यांचे चंदनाचे झाड

तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

          चंदगड तालुक्यातील आसगाव येथे मध्यरात्री चंदन चोरट्यानी चार चंदनाची झाडे लंपास केल्याने एकच खळबळ उडाली.

         येथील रामू महालू गावडे यांच्या गावाशेजारी असणाऱ्या शेतातील चार चंदनाची झाडे चंदन तस्करानी मध्यरात्री कापून लंपास केली. एखाद्या झाडाची फांदी तोडताना शेतकरी अनेक वेळा विचार करतो. त्यामध्ये तर चंदनासारखा दुर्मिळ वृक्ष तर तर तो जीवापाड जपतो. पण चंदन तस्करांच्या नजरेत असे वृक्ष पडताच ते रातोरात तोडून लंपास केले जाण्याच्या घटनामध्ये मोठी वाढ झाली आहे. अत्याधुनिक लाकूड कापन्याच्या यंत्रांचा वापर करून कोणताही आवाज न करता चंदन  वृक्ष लंपास केले जात आहेत. शेतकऱ्याने स्वतःच्या घरकामासाठी एखादे झाड तोडले तर अशा शेतकऱ्यावर वन विभाग तत्परतेने गुन्हे दाखल करते. पण लाखो रुपयांची चंदनाची झाडे रातोरात लंपास होत असताना या संदर्भात मात्र वन विभागाला थांगपत्ता लागत नाही. याचे मात्र आश्चर्य  वाटत आहे. यापेक्षा सर्वच शेतकऱ्यांना आपल्या शेतातील चंदनवृक्ष तोडण्याची परवानगी द्यावी म्हणजे चंदनतस्करांऐवजी किमान झाड मालक शेतकऱ्यांना तरी चार पैसे मिळतील. या चंदन चोरांचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे. याचा विचार वनविभागाने विचार करावा. अन्यथा आता केवळ चंदनचोर आहेत पुढे सागवान चोर निर्माण व्हायला वेळ लागणार नाही.

No comments:

Post a Comment