कोवाड महाविद्यालयाच्या वर्धापनदिनी विविध कार्यक्रमांचे आयोजन - चंदगड लाईव्ह न्युज

12 September 2022

कोवाड महाविद्यालयाच्या वर्धापनदिनी विविध कार्यक्रमांचे आयोजन

तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

          सर्वोदय शिक्षण संस्थेचे, कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय कोवाड (ता. चंदगड) चा 27  वा वर्धापन दिन दि. 15 सप्टेंबर 2022 रोजी   सकाळी    9.30 वा.   डॉ. ए. एस. जांभळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न   होत आहे. या कार्यक्रमात संस्थेला दिलेल्या योगदानाबद्दल माजी, रो. ह. यो.  राज्यमंत्री भरमू आण्णा पाटील यांचा सपत्निक सत्कार करण्यात येणार आहे. 

           तसेच नव्याने बांधण्यात आलेल्या क्रीडा भांडार गृहाचे उदघाटन डॉ. चंद्रशेखर साखरे यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.त्यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून र. भा. माडखोलकर महाविद्यालय चंदगडचे प्राचार्य डॉ. पी. आर. पाटील उपस्थित राहणार आहेत.  यावेळी संस्था उपाध्यक्ष बी. आर. पाटील, सचिव एम. व्ही. पाटील, खजिनदार गोविंद  प्रभू पाटील यांची प्रमुख उपस्थिती आहे. या निमित्त रांगोळी स्पर्धा, भितीपत्रक, ग्रंथ प्रदर्शन, अशा  विविध कार्यक्रमाचे आयोजन केले असून सदर  समारंभास परिसरातील हितचिंतकांनी, आजी माजी विद्यार्थ्यांनी  उपस्थित रहाण्याचे  आवाहन प्राचार्या डॉ. एम. एस. पवार यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment