हलकर्णीच्या कन्येला बांग्लादेशाची शिष्यवृत्ती, बांग्लादेशाच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्याहस्ते वैष्णवी आवडणचा गौरव - चंदगड लाईव्ह न्युज

12 September 2022

हलकर्णीच्या कन्येला बांग्लादेशाची शिष्यवृत्ती, बांग्लादेशाच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्याहस्ते वैष्णवी आवडणचा गौरव

दिल्ली येथे बांग्लादेशाच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्या हस्ते शिष्यवृत्ती स्विकारताना कु.वैष्णवी आवडण

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

        हलकर्णी (ता. चंदगड) येथील कु वैष्णवी प्रकाश आवडण हिला बांग्लादेशाची शिष्यवृत्ती मिळाली. दिल्ली येथील अशोक भवनात बांग्लादेशाच्या पंतप्रधान हसीना शेख यांच्या हस्ते वैष्णवीला ५०० डाॅलर ची शिष्यवृत्ती देऊन गौरविण्यात आले. 

          बांग्लादेशामार्फत १९७१ च्या भारत - पाक युध्दात शहीद झालेल्या जवानांच्या परिवारातील विद्यार्थ्यांसाठी बंगा बंधु शेख मुजबीर रेहमान शिष्यवृत्ती योजना राबवण्यात येते. यासाठी भारतातून दहा विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. त्यात शहीद नायब सुभेदार दत्तात्रय आवडण यांची नात कु. वैष्णवी प्रकाश आवडण (रा. हलकर्णी, ता. चंदगड, जि. कोल्हापूर) हिची निवड करण्यात आली. वैष्णवीला  इ.१० वी मध्ये तिला ९०.६० % इतके गुण मिळाल्यामुळे महाराष्टातून तिची या शिष्यवृत्तीसाठी निवड करण्यात आली होती. नवी दिल्ली येथे बांग्लादेशाच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्या हस्ते शिष्यवृत्ती देऊन तिचा गौरव करण्यात आला. यावेळी भारताचे परराष्ट्र मंत्री,बांग्लादेश देशाचे संरक्षण मंत्री आदीसह,दोन्ही देशातील अधिकारी वर्ग उपस्थित होता. शिष्यवृत्ती मिळाल्याने चंदगड तालुक्यासह कोल्हापूर जिल्ह्यात वैष्णवीचे कौतुक होत आहे.

No comments:

Post a Comment