रवळनाथ ' च्या चंदगड शाखा सल्लागारपदी घोरपडे - चंदगड लाईव्ह न्युज

12 September 2022

रवळनाथ ' च्या चंदगड शाखा सल्लागारपदी घोरपडे

 

प्रा. डाॅ. राजेश अजित घोरपडे

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

          चंदगड येथील श्री रवळनाथ को- ऑप हौसिंग फायनान्स सोसायटीच्या शाखा सल्लागारपदी प्रा. डाॅ. राजेश अजित घोरपडे यांची नियुक्ती केली आहे. अशी माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष एम. एल. चौगुले यांनी दिली. प्रा. घोरपडे हे हलकर्णी येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात पदार्थ विज्ञान विभागाचे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. तसेच त्यांनी नॅक समन्वयक म्हणूनही काम पाहिले आहे. २०११ ते २०१५ चा कालावधीत यापूर्वीही प्रा. घोरपडे यांनी रवळनाथच्या चंदगड शाखेचे सल्लागार म्हणून काम पाहिले आहे. त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक कामाची नोंद घेऊन संस्थेने त्यांना पुन्हा संधी दिली आहे.

No comments:

Post a Comment