कडलगे खुर्द येथील आदर्श विकास सेवा सोसायटीची सभा खेळीमेळीत - चंदगड लाईव्ह न्युज

12 September 2022

कडलगे खुर्द येथील आदर्श विकास सेवा सोसायटीची सभा खेळीमेळीतचंदगड / सी. एल. वृत्तसेवा

          आदर्श विकास सेवा सोसायटी मर्या. कडलगे खुर्द (ता. चंदगड) ची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न झाली. अध्यक्षस्थानी चेअरमन नारायण लक्षण कांबळे होते.

       प्रारंभी संस्थेचे सभासद, हिंतचितक, आजी माजी सैनिक विविध क्षेत्रातील  दिवंगतांना श्रद्धांजली वाहिली. प्रास्ताविक अशोक पाटील यांनी केले. यावेळी संस्थापक जी. डी. पाटील यांनी सांगितले की, सोसायटीला ४ लाख २२ हजार २६० रुपयांचा नफा झाला असून सभासदांना ६ टक्के लाभांश वाटप करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. संस्थेच्या नफ्यातून काढलेल्या इमारत निधितून स्वत:ची इमारत जागा घेवून इमारत बांधण्याचे उदिष्ट असल्याचे सर्व संचालकानी सांगितले. तत्पूर्वी संस्थेचे सचिव सुरेश पाटील यांची गटसचिव पतसंस्थेवर चेअरमनपदी निवड झाल्याबददल त्यांचा शाल श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. शिवाजी पाटील यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment