दौलतच्या कामगारांनी संप मागे घेऊन कामावर हजर व्हावे - अथर्वचे अध्यक्ष मानसिंग खोराटे यांचे आवाहन - चंदगड लाईव्ह न्युज

02 September 2022

दौलतच्या कामगारांनी संप मागे घेऊन कामावर हजर व्हावे - अथर्वचे अध्यक्ष मानसिंग खोराटे यांचे आवाहन

मानसिंग खोराटे

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

       हलकर्णी (ता. चंदगड) येथील अथर्व इंटरट्रेड प्रा. लिमिटेड कोल्हापूर संचलित दौलत शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांचा बेमुदत संप चालू आहे. हा कारखाना आहे, कारखाना सुस्थितीत आणण्यासाठी मोठा मोठा खर्च करावा लागला आहे. त्यासाठी बाहेरील वित्तीय संथेकडून मोठी कर्जे काढलेली असून कारखान्याचा डोलारा पुढे नेण्यासाठी कंपनीची आर्थिक दमछाक होत आहे. या परिस्थितीत सर्व कामगारांचे कंपनीला कारखाना चालविण्यासाठी पुर्ण सहकार्य असणे आवश्यक आहे. 

      चंदगड तालुका साखर कामगार युनियन (सिटु) यांनी अवास्तव मागण्यांचे निवेदन देऊन दि. १९ ऑगस्ट २०२२ पासून सर्व कामगार संपावर गेलेले आहेत.  जिल्हाधिकारी कोल्हापूर यांच्या शिष्टाईने कारखाना स्थळावर मिटिंग आयोजित करण्यात आली होती. यावेळी अथर्व व्यवस्थापनाकडून सकारात्मक चर्चा केली. त्या अनुषंगाने कामगारांनी स्वच्छेने मान्य केलेली पगार कपात तत्काळ थाबविणे व एप्रिल २०२२ पासूनाचा फरक पुढील चार महिन्यामध्ये देणेने मान्य केले. त्याप्रमाणे कामगारांच्या पगारवाड मागणी पोटीची रकम रु. ३ कोटी टप्या-टप्याने देण्याचे मान्य केले आणि यानुसार प्रत्येक कामगाराला किमान दरमाह रक्कम रु. ४ ते ५ हजार वाढ होणार आहे. अशी भरघोस पगारवाढ जाहीर केलेली असतानाही सदर प्रस्तावाला कर्मचारी संघटनेकडून जाणीवपूर्वक नकार दिला. 

           चंदगड तालुका साखर कामगार युनियन ( सिटू) या संघटनेचे नेतृत्व तालक्याबाहेरील व्यक्ती करत आहेत. त्यांनी कारखान्याचे वास्तव व आर्थिक गणित समजन घेऊन कारखाना टिकेल व कर्मचाऱ्याचे हित होईल अशी भूमिका घेऊन तडजोड करणे आवश्यक आहे. परंतु अथर्व कंपनीकडून कारखान्याचा ताबा घेणेपुर्वीच्या कालावधीतील पगारवाढ फरक व मोठी पगारवाढ ज्यायोगे कंपनीचा आर्थिक कणा कोलमडून पडेल व कारखाना पूर्वीच्या खाईत लोटेल अशा अवास्तव मागण्या केल्यामुळे तोडगा होऊ शकला नाही. तडजोड न होण्या पाठीमागे कामगार संघटनेची आडमुठी भूमिका व बाहेरील नेतृत्वचा प्रभाव कारणीभूत आहे. याचा तालुक्यातील सर्व उस उत्पादक शेतकरी वर्ग, कामगार व काराखन्यावर अवलंबून असणारे सर्व घटक यांनी सखोल विचार करणे आवश्यक आहे. प्राप्त परिस्थितीत कारखान्याच्या आर्थिक गणिताचा सांगोपांग विचार करावा आणि यापूर्वी दिलेला पगारवाढीचा प्रस्ताव मान्य करून कर्मचाऱ्यांनी उचललेले संपाचे पाऊल पाठीमागे घ्यावे असे कारखान्याचे अध्यक्ष मानसिंग खोराटे यांनी आवाहन केले आहे.
No comments:

Post a Comment