दौलत कामगार व अथर्व व्यवस्थापनाची संपाबाबत शनिवारी प्रांत कार्यालयात बैठक - चंदगड लाईव्ह न्युज

02 September 2022

दौलत कामगार व अथर्व व्यवस्थापनाची संपाबाबत शनिवारी प्रांत कार्यालयात बैठक

 

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देताना कामगार कामगार नेते प्रा. सुभाष जाधव, शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे


चंदगड / प्रतिनिधी

      अथर्व इंटरट्रेड व दौलत कामगार संघटना यांच्यातील संपाबाबत वाटाघाटी समाधानकारक न झाल्याने शनिवार दि. ३ सप्टेंबर रोजी दुपारी ३.०० वाजता गडहिंग्लज येथील तहसील कार्यालयात प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांच्या अध्यक्षतेखाली कामगार प्रतिनिधी व अथर्व व्यवस्थापन यांच्या समवेत बैठक आयोजित केली आहे.

       कामगार नेते प्रा. सुभाष जाधव, शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना फेर चर्चा घडवावी अशी लेखी पत्राद्वारे विनंती केली. या वेळी जिल्हाधिकारी यांनी प्रांताधिकारी बाबासाहेब वागमोडे यांच्या अध्यक्षतेखाली  कामगार संघटना व अथर्व शुगरचे मानसिंग खोराटे, चंदगड तहसीलदार विनोद रणवरे, कामगार आयुक्त, साखर सह संचालक, प्रदीप पोवार, प्रभाकर खांडेकर यांचे समवेत शनिवार दि. ३ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वा. गडहिंग्लज येथील तहसील कार्यालयात बैठक घ्यावी आशा सूचना जिल्हाधिकारी यांनी प्रांताधिकारी यांनां दिल्या आहेत.

No comments:

Post a Comment