आमदार अनिल बेनके |
तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा
बेळगाव उत्तरचे आमदार अनिल बेनके आयोजित ताल जल्लोष भव्य ढोलताशा स्पर्धांचे आयोजन दि ७, ८ व ९ ऑक्टोबर रोजी बेळगाव येथे केले आहे.
दसरा महोत्सवानिमित्य या स्पर्धा सरदार हायस्कूल ग्राऊंड बेळगाव येथे सायंकाळी ६ वाजता होणार आहेत. यासाठी स्मृती चिन्हासह १ लाख ११ हजार १११ रूपयांचे प्रथम क्रमांकाचे बक्षिस आहे. द्वितिय ७५ हजार रूपये , तृतिय ५१ हजार रूपये, दोन उत्तेजनार्थ २५ हजार रूपये व स्मृतिचिन्ह अशी बक्षिसे आहेत. तसेच उत्कृष्ठ ढोल वादक, ताशा वादक, ध्वज धारी, टोल वादक याना प्रत्येकी ११ हजार रूपयांची बक्षिसे देण्यात येणार आहेत. विनामुल्य प्रवेश असणाऱ्या या स्पर्धांचा लाभ घेण्याचे आवाहन प्रभाकर देसुरक(मो. ८१ ४७ ४१४८०१) यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment