कोवाड मर्चंट पतसंस्थेच्या सभासदांना १०टक्के लाभांश देणार - चंदगड लाईव्ह न्युज

30 September 2022

कोवाड मर्चंट पतसंस्थेच्या सभासदांना १०टक्के लाभांश देणार

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

         कोवाड (ता. चंदगड) येथील दि कोवाड मर्चंट सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी चेअरमन कल्लाप्पा रामजी वांद्रे हे होते. स्वागत व प्रास्ताविक संचालक बी के पाटील यांनी केले. अहवाल वाचन मॅनेजर पी पी पाटील यांनी केले. संस्थेला अहवाल सालात रुपये १४ लाख २६ हजार ३१५ इतका नफा झाला असून सभासदांना १० टक्के लाभांश देण्याचे जाहीर करण्यात आले. यावेळी सभासदांच्या दहावी दहावी बारावी परीक्षेत गुणानुक्रमे प्रथम आलेल्या प्रत्येकी तीन मुलांचा स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यावेळी व्हाईस चेअरमन के वाय कांबळे, संचालक वीरुपाक्ष गणाचारी, बाळासाहेब वांद्रे, मारुती पांडुरंग पाटील, बंडू तोगले, विष्णू गावडे, एन एम काझी, शिवाजी तेली आदींसह सभासद उपस्थित होते. आभार संचालक दयानंद मोटूरे यांनी मानले.

No comments:

Post a Comment