गाव झकास...मात्र रांगी वसाहत भकास, माणगाव येथील फलकाने वेधले समस्याकडे लक्ष - चंदगड लाईव्ह न्युज

26 September 2022

गाव झकास...मात्र रांगी वसाहत भकास, माणगाव येथील फलकाने वेधले समस्याकडे लक्ष

डिजीटल फलक

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

        माणगाव (ता. चंदगड) ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात वसलेल्या रांगी वसाहतीतील नागरिकांनी ग्रामपंचायतीने वसाहतीतील  विकासकामाकडे केलेल्या दुर्लक्षामुळे लक्ष वेधण्यासाठी गावात उभा केलेल्या फलकाने नागरिकांचे लक्ष वेधले आहे.

        माणगाव ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात गावापासून ७०० मिटर अंतरावर रांगी नावाच्या शेतात १७/१८ नागरिकांनी घरे बांधून कुटूबांसह वास्तव्य करत आहेत. पण येथील नागरिकना ग्रामपंचायतीकडून पक्के रस्ते, गटारे, पाणी, दिवाबत्ती आदी सुविधा अद्याप दिलेल्या नाहीत. स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली पण माणगांवच्या रांगी वसाहतीला अजूनही पारतंत्र्यात असल्याची जाणीव होत आहे. गावचा विकास झाला पण वाड्या वस्त्यांचा विचार अजिबात होत नाही. ८ वर्षापूर्वी कै. बाबा कुपेकर यांच्या फंडातून या रस्त्याचे खडीकरण झाले होते. ते खडीकरण उखडून गेल्याने रस्त्याची दयनीय आवस्था झाली आहे. रस्त्याला आजतागायत  डांबरी रस्ता नाही,गटर नाही, पथदिवे नाहीत याबद्दल रांगी वसाहतीतील लोकांच्या मनात खंत आहे. आजही लोक रात्रीच्या अंधारात माग काढत जातात, एन पावसाळ्यात वीतभर पाण्यातून जावे लागते इतकी वाईट अवस्था असताना लोकप्रतिनिधिंचे अक्षम्य दुर्लक्ष्य कसे?

         ग्रामपंचायतीकडे मागणी करून १४ व्या व १५ व्या वित्त आयोगातील निधी ही या वसाहतीतील विकासकामांवर खर्च केला नसल्याचे येथील नागरिकाचे म्हणणे आहे.कोणत्याही शासकीय योजनेचा फायदा झाला नाही ही. ह्या रस्त्याला आजतागायत  डांबरी रस्ता नाही, गटर नाही, पथदिवे नाहीत. याबद्दल रांगी वसाहतीतील लोकांच्या मनात खंत आहे. त्यामुळे रांगी वसाहतीतील  प्रकाश बेनके, राणबा बेनके, रवी नौकुडकर, दत्तात्रय बेनके, रवी बेनके, विश्वनाथ बेनके, महादेव बेनके, मारुती बेनके, तुकाराम बेनके, विलास बेनके, पवन बेनके, प्रकाश नौकुडकर आदी नागरिकानी डिजिटल फलक लावून वसाहतीतील समस्यांबाबत संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत.

No comments:

Post a Comment