विंझणे येथे आईचा स्मृतीदिन वेगळ्या पद्धतीने साजरा , विद्यार्थ्याना दिले शैक्षणिक साहित्य - चंदगड लाईव्ह न्युज

22 September 2022

विंझणे येथे आईचा स्मृतीदिन वेगळ्या पद्धतीने साजरा , विद्यार्थ्याना दिले शैक्षणिक साहित्य

 

विंझणे येथे शैक्षणिक साहित्याचे वितरण करताना मान्यवर

तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

आपल्या आईच्या स्मृतीदिनाला पैसा वाया न खालवता त्या पैशातून विंझणे गावातीत सर्व विद्यार्थ्याना शैक्षणिक साहित्य वाटून कै. पार्वतीबाई विठोबा गिलबिले यांचा २ रा स्मृतिदिन साजरा करण्याचा स्तृत्य उपक्रम विंझणे (ता. चंदगड) येथील गिलबिले कुटूंबियानी केला.

       यावेळी अंगणवाडी ते इयत्ता १० वी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्याना लेखन साहित्य व खाऊचे वाटप विठोबा गिलबिले, सौ अहिल्या बामणे, सौ. सुवर्णा सावंत, सौ. सुगंधा निकम यांच्या हस्ते  करण्यात आले. या कार्यक्रमाला मराठी विद्यामंदिरचे शिक्षक  तुकाराम कदम , विठ्ठल पिटूक, निवृत्ती तिबिले ' अंगणवाडी सेविका सौ. नाईक यांच्यासह ग्रामस्थ वि विद्यार्थी  उपस्थित होते.

No comments:

Post a Comment