तडशिनहाळचे निवृत्त पोलीसपाटील दत्तू पाटील यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

23 September 2022

तडशिनहाळचे निवृत्त पोलीसपाटील दत्तू पाटील यांचे निधन

दत्तू गुंडू पाटील

कागणी : सी. एल. वृत्तसेवा 

तडशिनहाळ (ता. चंदगड) गावचे निवृत्त पोलीसपाटील दत्तू गुंडू पाटील (वय 86) यांचे बुधवारी दि. 21 रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, चार मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. ते गावातील विकास सोसायटीचे माजी चेअरमन होते.

तडशिनहाळचे विद्यमान पोलीसपाटील भालचंद्र पाटील व शिनोळी खुर्द (ता. चंदगड) येथील कृषीवल काजू फॅक्टरीचे मॅनेजर विठ्ठल पाटील यांचे ते वडील होत. रक्षाविसर्जन शुक्रवारी सकाळी होणार आहे.

No comments:

Post a Comment