रंकाळा येथील अध्यापक महाविद्यालयात विविध स्पर्धांचा बक्षिस वितरण समारंभ उत्साहात - चंदगड लाईव्ह न्युज

23 September 2022

रंकाळा येथील अध्यापक महाविद्यालयात विविध स्पर्धांचा बक्षिस वितरण समारंभ उत्साहात

कोल्हापूर :विजेत्या स्पर्धकांना बक्षीस देताना प्राध्यापक वर्ग.

चंदगड / कागणी : सी. एल. वृत्तसेवा

     श्री शाहू शिक्षण प्रसारक मंडळ संचलित अध्यापक महाविद्यालय रंकाळा, कोल्हापूर येथे  प्रथम व द्वितीय वर्षातील प्रशिक्षणार्थी यांच्यात शनिवार दि.०३ सप्टेंबर रोजी आयोजित केलेल्या पारंपरिक खेळ, झिम्मा फुगडी, लोकनृत्य, पिंगा, गितगायन  अशा विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले होते. या स्पर्धेमध्ये मोठ्या संख्येने प्रशिक्षणार्थी यांनी भाग घेतलेला होता. या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ सोहळा गुरुवार दि.२२ रोजी महाविद्यायात करण्यात आले.

        या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  महाविद्यालयाचे प्राचार्य एस. के. कांबळे होते. प्रा. सी. एस. गुरव, प्रा. सौ. डी. डी. सरनाईक, प्रा. सौ. जे. पी.पाटील व प्रा. सौ. के. एस. गुरव उपस्थित होत्या. यावेळी विजेत्या स्पर्धकांना अध्यक्षांच्या हस्ते बक्षिस देऊन गौरवण्यात आले.

 सूत्रसंचालन प्रा. सौ. डी. डी. सरनाईक यांनी केले. यावेळी अध्यक्षांनी आपल्या मनोगतातून मार्गदर्शन व प्रेरणा दिली. तसेच वर्षभरातील उपक्रमाचा आढावा वाचून दाखविला. यावेळी प्रथम व द्वितीय वर्षातील प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.आभार प्रा. सी. एस. गुरव यांनी मानले.


No comments:

Post a Comment