हिंदी भाषा सामाजिक ऐक्य व अखंडतेचा ठेवा - डॉ. संजीवनी पाटील - चंदगड लाईव्ह न्युज

23 September 2022

हिंदी भाषा सामाजिक ऐक्य व अखंडतेचा ठेवा - डॉ. संजीवनी पाटील

 

चंदगड महाविद्यालयात हिंदी दिन कार्यक्रमात बोलताना डॉ. संजीवनी पाटील

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

        जगामध्ये सर्वाधिक बोलली जाणारी व समजली जाणारी राजभाषा म्हणून हिंदीची ओळख आहे. त्यामुळेच ही भाषा आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचली आहे, ही भाषा म्हणजे सामाजिक ऐक्य व अखंडतेचा ठेवा आहे तो जतन करण्याची व प्रचार-प्रसार करण्याची जबाबदारी आपली आहे.असे मत डॉ. संजीवनी पाटील यांनी  र. भा. माडखोलकर महाविद्यालयाच्या हिंदी विभागाच्या वतीने आयोजित हिंदी दिन सप्ताह समारोहात व्यक केले. 

      कार्यक्रमाची सुरुवात इशस्तवनाने झाली. विविध स्पर्धांमध्ये यशस्वी विद्यार्थ्यांना पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. प्रास्ताविकाद्वारे हिंदी विभाग प्रमुख प्रा. संजय पाटील यांनी कार्यक्रमाचा उद्देश सांगितला व पाहुण्यांचा परिचय  करून दिला. 

        डॉ पाटील पुढे म्हणाल्या हिंदी भाषा जनसामान्यांची असल्याने म. गांधी सारख्या महात्म्यानी या भाषेला सन्मान मिळवून दिला. स्वातंत्र्यासाठी या भाषेने मोठे योगदान दिले आहे. कॉर्पोरेट जगतात व तंत्रज्ञानाच्या युगात ही भाषा टिकविण्याची कसरत आपल्याला करायला हवी. हिंदी आज अनेक विश्वविद्यालयामध्ये शिकविली जाते ही अत्यंत अभिमानास्पद बाब आहे. जाति, धर्म, वर्ण यापलीकडे जाऊन विविधतेतून एकदा निर्माण करण्याचे महान कार्य हिंदी भाषा करीत आहे याचा सर्वांना अभिमान आहे. सद्भावनेला महत्त्व देणारी ही भाषा असल्यामुळे एक भावनिक गोडवा व माधुर्य या भाषेत आहे.  अंतरजालीय युगात या भाषेने आपले प्रभुत्व सिद्ध केले आहे. त्यामुळे संपूर्ण विश्वाची ही अत्यंत लोकप्रिय भाषा बनले आहे. फिल्म, मालिका व मीडियाने तर या भाषेला गवसणी घातली आहे.   साहित्यकार व क्रांतिकारकानी या भाषेला सन्मान मिळवून दिला आहे. तो आबादित ठेवायचा आहे.अध्यक्षीय समारोपामध्ये प्राचार्य डॉ. पी.आर. पाटील म्हणाले भाषा ही वैचारिक देवाण-घेवाणीचे प्रभावी माध्यम आहे. माणसाला एक-दुसऱ्याशी जोडण्याचे कार्य भाषा करतात. हिंदीचा यामध्ये मोठा वाटा आहे. देवनागरी सारखी समृद्ध लिपी याभाषेला मिळालेली देणगी आहे. सर्व भाषा ज्ञानार्जणासाठी उपयुक्त असतात त्यांचा सर्वांनी सन्मान करायला शिकले पाहिजेत. हिंदी दिनाच्या निमित्ताने याचा आपण विसर पडू देऊ नये असे त्यांनी सांगितले. विक्रम कांबळे यानी मनोगत व्यक्त केले. इंदूताई कांबळे व सहकारी यानी गीत सादर केले. याप्रसंगी नेहरू युवा केंद्र, कोल्हापूरचे समन्वयक अमेय सबणीस, ओंकार सबणीस महाविद्यालयाचा सर्व स्टाफ आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे  सूत्रसंचालन रसिका पाटील हिने केले, आभार डॉ. रंजना कमलाकर यांनी मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

No comments:

Post a Comment